खाऊचे आमिष दाखवून नराधमाकडून 7 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

खाऊचे आमिष दाखवून नराधमाकडून 7 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

नाशिकमधील अंबड परिसरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

  • Share this:

नाशिक,9 डिसेंबर: नाशिकमधील अंबड परिसरात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. खाऊचे आमिष दाखवून 26 वर्षीय नराधमाने सात वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घृणास्पद घटना समोर आली आहे.

कैलास कोकणी असे या नराधमाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने शेजारी राहणाऱ्या एका सात वर्षाच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने झालेला प्रकार घरी सांगितल्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या घटनेने नाशिक शहरात खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे. नराधमावर कायद्यानुसार 15 दिवसांच्या आत कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सख्खे भाऊ पक्के वैरी.. अल्पवयीन बहीणीचे अपहरण केला बलात्कार

दुसऱ्या एका घटनेत सख्या भावांनीच आपल्या बहिणीवर बलात्कार केला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील चिमुकलीवरील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच जिल्ह्यातील गंगापूर-टाकळघाट येथे दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीचे महिनाभरापूर्वी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने खळबळ माजली आहे. आकाश संजय कारमोरे (वय 27) व शुभम संजय कारमोरे (वय 21, दोघेही गंगापूर झोपडपट्टी, टाकळघाट) या दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे.

14 वर्षीय पीडिता मूळची भंडारा जिल्ह्यातील लाखनीची आहे. आई आणि वडील विभक्त असल्याने आई बुटीबोरी परिसरातील टेंभरी येथे राहाते व एका विश्रामगृहात मजूरी करून उदरनिर्वाह करते. पीडित मुलगी लाखनी येथे शिकत असून दिवाळीच्या सुटीत ती आईकडे आली होती. आकाशने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधला व गोडीगुलाबीने बोलून तिला आमिषे दाखवले. मुलगी आमिषांना भूलल्याने आकाशने तिला पळवून नेले. दुसरीकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली. नातेवाईकांना हा प्रकार कळताच त्यांनी तिला शोधून पोलिस ठाण्यात आणले.

महिला पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. आकाशने तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध ठेवले. तसेच आकाशने तिला गंगापूर येथील त्याच्या मामाकडे ठेवल्याचे सांगितले. आकाशने पीडितेला आई वडील नसल्याचे कारण मामाला सांगितले होते. तिथे शुभमनेही तिच्याशी शरीर संबंध ठेवल्याचे सांगितले. एमआयडीसी पोलिसांनी भादंवि कलम 363, 366 व 376 नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 9, 2019, 10:17 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading