एकाच तरुणीवर यावल शहरात 3 तर भुसावळात 2 नराधमांनी केला बलात्कार

एकाच तरुणीवर यावल शहरात 3 तर भुसावळात 2 नराधमांनी केला बलात्कार

यावल तालुक्यातील बामणोद येथील 22 वर्षीय तरूणीवर झालेल्या कथित बलात्कारप्रकरणी यावल पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. 8 ते 12 एप्रिल दरम्यान तरुणीवर यावल शहरातील 3 तर भुसावळातील 2 अशा पाच नराधमांनी बलात्कार केला होता.

  • Share this:

भुसावळ, 28 एप्रिल- यावल तालुक्यातील बामणोद येथील 22 वर्षीय तरूणीवर झालेल्या कथित बलात्कारप्रकरणी यावल पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. 8 ते 12 एप्रिल दरम्यान तरुणीवर यावल शहरातील 3 तर भुसावळातील 2 अशा पाच नराधमांनी बलात्कार केला होता. हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडून यावल पोलिसांकडे वर्ग झाला आहे.

नेमके काय आहे हे प्रकरण?

बामणोद येथील पीडित तरुणीचे 8 एप्रिल रोजी यावल बसस्थानकावरून तीन तरूणांनी दुचाकीवरून अपहरण केले आहे. बुरूज चौकाच्या पुढील एका इमारतीत व शहरातील विस्तारीत भागातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत 9 एप्रिलच्या मध्यरात्री नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पहाटे भुसावळला सोडून सोडले. भुसावळ येथील दोन तरूणांनी तिला 11 एप्रिलला रिक्षामध्ये मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे नेवून तिच्यावर बलात्कार केला, अशी आपबीती पीडितेने पोलिसांसमोर कथन केली.

याप्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

त्यात दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली. अद्याप त्यांची नावे जाहीर झालेली नसली तरी ओळख परेड झाल्यावर पुढील कारवाई होईल, असे यावलचे पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे, उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे या गुन्ह्याचा तपास करत आहे.

First published: April 28, 2019, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading