सागर सुरवसे, प्रतिनिधी
सोलापूर, 07 जानेवारी : करमाळा तालुक्यातील वांगी गावात ऊसतोडणीसाठी आलेल्या कामगाराच्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करून दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
वांगी गावाच्या शिवारात आज सकाळी 11.30 च्या सुमारास ही संतापजनक घटना घडली आहे. आई-वडील शेतात ऊस तोडायला गेले, असताना बाथरुमसाठी बाहेर पडलेल्या या 14 वर्षीय मुलीवर दुष्कर्म करण्यात आले होते. आपली वाच्यात कुठे होऊ नये, म्हणून या नराधमांनी मुलीला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी अवस्थेत या मुलीला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
============================