अमरावती, 12 सप्टेंबर : मुंबईतील साकीनाका सामूहिक बलात्कार (Mumbai Sakinaka rape case) आणि हत्या प्रकरण आणि अमरावतीत झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरून गेलं असतांना आज पुन्हा अमरावती जिल्ह्यात 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहीमापूर पोलीस ठाण्या अंतर्गत अत्याचाराची घटना घडली आहे. पीडित चिमुरडी ही आपल्या मैत्रिणी सोबत गावाबाहेर शौचालयाला जात होती. त्यावेळी गावातील एका 20 वर्षीय नराधमाने तिला गवत कापायला जाऊ या बहानाने दुचाकीवर बसवून स्वतःच्या शेतात नेलं व तिथं तिच्याशी बळजबरी करून अत्याचार केला.
अमानूष! घटस्फोट मिळण्यासाठी क्रूरतेचा कळस, गर्भवती पत्नीला टोचलं HIVचं इंजेक्शन
पीडित मुलगी घरी आल्यानंतर तिने सर्व हकीकत आईला सांगितलं. त्यानंतर पीडितेला घेऊन आईने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून नराधम युवकाविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
दरम्यान, दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीशी नराधमाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ही अल्पवयीन मुलगी 17 वर्षाची होती. यातून अल्पवयीन 7 महिन्याची गर्भवती असताना बदनामीच्या भीती पोटी तिने स्वतः ला गळफास लावून घेतला. या प्रकरणी येवदा पोलिसांनी या नराधमास ताब्यात घेतले आहे. तर पोस्को अंतर्गत गुन्हे देखील दाखल केले आहे. या संदर्भात अधिक तपास येवदा पोलीस करताहेत.
परश्याचा Messy हेअर LOOK; आकाशने ब्लॅक अँड व्हाईट फोटो केले शेअर
अमरावतीत दोन दिवसात दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्याने जिल्ह्यात मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे आता राज्यात कायद्या नाही का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.