मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रायगड हादरलं, दिवाळीच्या पूर्वसंध्येला 5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

रायगड हादरलं, दिवाळीच्या पूर्वसंध्येला 5 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

रोहा तालुक्यात दिवाळीच्या पूर्व संध्येला माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.

रोहा तालुक्यात दिवाळीच्या पूर्व संध्येला माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.

रोहा तालुक्यात दिवाळीच्या पूर्व संध्येला माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.

रायगड, 08 नोव्हेंबर : रायगड (raigad) जिल्ह्यात सातत्याने विनयभंग व बलात्काराच्या घटना घडत आहेत. आणखी एक धक्कादायक व संतापजनक प्रकार समोर आला आहे. रोह्यात (rohya) एका 5 वर्षांच्या चिमुरडीवर दिवाळीच्या (diwali) आदल्या दिवशी एका 35 वर्षीय नराधमाने बलात्कार (rape) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,   रोहा तालुक्यात दिवाळीच्या पूर्व संध्येला माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. राकेश शिर्के (वय 36 रा. हाळ विरझोली) असं या नराधमाचे नाव आहे.

पीडित चिमुरडी घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी या नराधमाने तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगी रडत घरी आली असता आईने विचारपूस केली. तेव्हा पीडितेनं आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली.

राजकुमार राव-पत्रलेखाचं ठरलं ! पारंपारिक पद्धतीने करणार लग्न, तयारी सुरू

त्यानंतर पीडितेच्या आईने आणि कुटुंबातील सदस्यांनी तातडीने पोलीस स्टेशनकडे धाव घेतली.  याबाबत रोहा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी राकेश हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पीडित मुलीवर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

पुण्यात विवाहितेला गोठ्यात डांबून सामूहिक अत्याचार

तर दुसरीकडे पुण्यामध्येही बलात्काराची घटना घडली आहे. पुणे (Pune) जिल्ह्याच्या भोर (Bhor) तालुक्यातील भांबवडे गावात एका 29 वर्षीय विवाहित महिलेवर गावातील दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार (Married woman gang rape) केल्याची घटना समोर आली आहे.

SMS आणि मिस्ड कॉलद्वारे चेक करा बँक बॅलेन्स, PNB बँकेची सुविधा, पाहा प्रोसेस

पीडित महिलेचा पती रुग्णालयात उपचार घेत असल्याचं समजल्यानंतर आरोपींनी डाव साधला आहे. एकट्या महिलेला गुरांच्या गोठ्यात डांबून सामूहिक अत्याचार (gang rape in cowshed) केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. अनिल वाडकर, महेश सोनवणे आणि हनुमान कापरे असं ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं असून सर्व आरोपी भांबवडे येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी पीडित महिलेनं स्वत: राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

First published:

Tags: Raigad, Raigad news, Rape, Rape news, रायगड