नोकरीसाठी औरंगाबादेत आलेल्या भाचीवर दोन मामांनी केला बलात्कार

नोकरीसाठी औरंगाबादेत आलेल्या भाचीवर दोन मामांनी केला बलात्कार

नोकरीसाठी औरंगाबादेत आलेल्या 19 वर्षीय तरूणीवर तिच्या सख्या दोन मामांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

सचिन जिरे, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 4 जुलै- नोकरीसाठी औरंगाबादेत आलेल्या 19 वर्षीय तरूणीवर तिच्या सख्या दोन मामांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली आहे. अब्दुल्ला खान व शाहरुख खान अशी दोन्ही बलात्कारी मामांची नावे आहेत. पीडिता तरुणी आणि आरोपी उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत.

मिळालेली माहिती अशी की, दोन मामांनी सख्या भाचीला धमकावत तब्बल वर्षभर बलात्कार केला. सततच्या या प्रकाराला कंटाळून पीडितेने वडिलांना फोन करून आपबिती सांगितली. पीडितेच्या वडिलांनी थेट औरंगाबाद गाठून आरोपींच्या तावडीतून पीडितेची सुटका केली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

औरंगाबादेत उच्चभ्रू वसाहतीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

सातारा परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत पोलिसांनी सापळा रचून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सातारा परिसरातील द्वारकदास नगरात छुप्या पद्धतीने देहविक्री केली जात होती. पोलिसांनी खबऱ्याच्या मदतीने सापळा रचून या प्रकरणाचा भंडाफोड केला. दोन तरुणींसह आणि दलालांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, द्वारकदासनगरात शेजारी-शेजारी असलेल्या दोन रो-हाऊसमध्ये मुंबई येथील तरुणींना औरंगाबादेत बोलवून त्यांच्याकडून देहविक्री करवून घेत होते. मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे सातारा आणि पुंडलिकनगर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. पंटरच्या मदतीने सापळा रचून तुषार राजपूत आणि प्रवीण कुरकुटे या दोन दलालासह देहविक्री करणाऱ्या दोन तरुणींना अटक केली आहे. हे दोन्ही दलाल राज्यातील विविध शहरातून मुलींना औरंगाबादेत आणून त्यांच्याकडून देहविक्री करून घेतल्याप्रकरणी सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल आडे यांनी दिली आहे.

VIDEO:वामन हरी पेठेतून तब्बल 27 कोटी रुपयांच्या सोन्याची चोरी

First published: July 4, 2019, 10:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading