सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड, 02 फेब्रुवारी : बीडच्या न्यायालयातून आरोपी पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकून अनिल सुनील पवार या आरोपीने पलायन केलं आहे. या संपूर्ण घटनेमुळे न्यायालय परिसर हादरून गेला आहे.
आरोपी अनिल हा बीड शहरातील बाळासाहेब शिंदे कॉलनीमध्ये राहणारा रहिवाशी होता. 2017मध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अनिल हा जेलमध्ये होता. त्याला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याला हाताला हिसका देवून पलायन केलं आहे.
या प्रकरणात आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पण आरोपी तिसऱ्या मजल्यावरून पळून जाईपर्यंत सुरक्षा व्यवस्था काय करत होती असा सवाल आता उपस्थित होत आहे.
VIDEO: AK-47ने गोळ्या झाडून पोलिसांनी हल्लेखोरांना केलं ठार, पाहा लाईव्ह एन्काऊंटर