क्रूरतेचा कळस! बुलडाण्यात 16 वर्षीय गतिमंद मुलीवर दोघांनी केला बलात्कार

क्रूरतेचा कळस! बुलडाण्यात 16 वर्षीय गतिमंद मुलीवर दोघांनी केला बलात्कार

खेर्डा गावातील अपंग महिलेवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात दुसरी घटना म्हणजे गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला.

  • Share this:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलडाणा, 11 डिसेंबर : बुलडाण्यात काळजाचं पाणी करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. खामगाव तालुक्यातील दोन नराधमांनी हा अत्याचार केला. घाटपुरी गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. एका आठवड्यात जिल्ह्यातील दुसरी घटना असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. खेर्डा गावातील अपंग महिलेवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात दुसरी घटना म्हणजे गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी करत दोन आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हैदराबाद सामूहित बलात्कार आणि हत्या प्रकरण, उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. हैदराबाद प्रकरणात पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या श्रीरामपूरमध्ये बेड्यांसकट आरोपी पळून गेल्याचं समोर आलं आहे.

इतर बातम्या - फायनान्स क्षेत्रातील गोव्याच्या तरुणाची मुंबईत आत्महत्या, नस कापून संपवलं आयुष्य

अल्पवयीन मुलीवर केले होते अत्याचार, रुग्णालयातून बेड्यासह पळाला आरोपी!

वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन आलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देत बेड्यांसह पलायन केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथं घडली.

मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान वैद्यकीय तपासणीसाठी आरोपी राहुल गणेश शिंदे (वय २०) याला तीन पोलीस कर्मचारी घेऊन आले होते. परंतु, तपासणी झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देत मुख्य प्रवेशद्वारातून त्याने पळ काढला. आरोपीने पळ काढल्यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. पोलीस आणि रुग्णालयातीत कर्मचाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग केला. पण रुग्णालयाच्या मागील बाजूने भिंतीवरून उडी मारत पळ काढला.  शिरसगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत तो पळाला. यानंतर थोड्याच वेळात पोलिसांची कुमक दाखल झाली.

इतर बातम्या - डीएसकेंच्या अडचणीत वाढ, सांगली पोलिसांनी पत्नी आणि मुलासह येरवडा जेलमधून अटक

आरोपी शिंदेनं एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते. त्याच्यावर याआधी मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्याकडे आहे. या घटनेबद्दल विचारणा केली असता आरोपी पळाल्याच्या घटनेला त्यांनी दुजोरा दिला. या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

इतर बातम्या- भारतीय पोषाख परिधान करून 'Nobel' घेण्यासाठी पोहोचले अभिजीत बनर्जी, एस्टर डफलो

Published by: Renuka Dhaybar
First published: December 11, 2019, 11:22 AM IST
Tags: rape case

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading