Home /News /maharashtra /

नातेवाईकांचा 'हैदराबाद पोलीस' स्टाईल बदला, बलात्कार करणाऱ्याला इतके मारले की गेला जीव!

नातेवाईकांचा 'हैदराबाद पोलीस' स्टाईल बदला, बलात्कार करणाऱ्याला इतके मारले की गेला जीव!

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळून हत्या करण्याच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र हादरून गेलाय, ही घटना ताजी असताना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका 55 वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली.

अकोले,  5 फेब्रुवारी : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथं प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळून हत्या करण्याच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र हादरून गेलाय, ही घटना ताजी असताना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एका 55 वर्षीय महिलेवर बलात्काराची घटना घडली. त्यानंतर संतापलेल्या पीडितेच्या नातेवाईकांनी नराधमाला मारहाण करून ठार मारलंय. या प्रकरणी राजूर पोलिसांत अत्याचाराचा आणि खूनाचा असे दोन गुन्हे दाखल झाले आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील शिरपुंजे गावात एका ५५ वर्षीय महिलेवर गावातीलच ४५ वर्षीय राजू गणपत सोनवणे या व्यक्तीने अत्याचार केला. यावेळी पीडित महिलेने सदर घटना घरी सांगितल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सदर आरोपीला गावात मारहाण केली. आरोपी पळून जावू नये म्हणून दगडी बाकाला बांधून ठेवले आणि  मारहाण केली. त्यानंतर आरोपीला पोलीस स्टेशन राजूरला आण्यात आलं. जखमी अवस्थेत असलेल्या आरोपीला पोलिसांनी राजूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केलं. परंतु, प्रकृती गंभीर असल्यानं नाशिकला हलवण्यात आलं होतं. मात्र, रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.  या प्रकरणी राजुर पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरोपीच्या हत्येप्रकरणी खूनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल पहिल्या गुन्ह्याबाबत पीडित ५५ वर्षीय महिलेनं फिर्याद दिली असून यात म्हटलं आहे की, ४ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास जायणावाडी गावच्या शिवारात खंडोबाचे माळावर जणावरं चारण्यासाठी गेलेली असताना आरोपी राजू गणपत सोनवणे ( वय ४५रा.शिरपुंजे) याने  पीडितेची दोन्ही हाताला कवळी मारून खाली पाडले आणि अत्याचार केला. आरोपीवर गु.र.न.३१/२०२०भा.द.वी.कलम ३७६प्रमाणे दाखल केले आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस पाटलांनी दिलेल्या फिर्यादीवरून, ४ फेब्रुवारी २०२० रोजी शिरपुंजे येथील महिलेवर अत्याचाराच्या घटनेनंतर दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान, सदर घटनेचा राग मनात धरून तीन जणांनी आरोपी राजू सोनवणे याला जबर मारहाण केली होती. त्यात तो मयत झाला. या फिर्यादीवरुन तीन जणांविरुद्ध गु.र.न.३७/२०२० भा.द.वी.कलम ३०२,३४ प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन पाटील करत आहेत. निर्भयाच्या नराधमांना एकत्रच फाशी, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय दरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एक मोठा निर्णय दिला आहे. दोषींना एक आठवड्याच्या आत सर्व कायदेशीर पर्याय अवलंबण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने सांगितले की, एका आठवड्यात सर्व दोषींनी आपली लीगल रेमिडीस घ्यावी. याशिवाय सर्व दोषींना एकत्रित फाशी देण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाच्या याचिकेवर उच्च न्यायालयातच निपटारा केला जाईल, असेही न्यायालयाने सांगितले. या निर्णयामुळे निर्भयाच्या दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात येईल, हे स्पष्ट झालं आहे. निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात दिरंगाई होत आहे. मात्र केंद्र सरकारने दाखल केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोर्टाने सांगितले, की सर्व दोषींना वेगवेगळी फाशी दिली जाणार नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने पतियाळा हाऊस न्यायालयाच्या निर्णयाला योग्य मानून सर्व दोषींना एकत्र फाशी देणेच योग्य मानले. केंद्राने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांचे म्हणणे होते की सर्व दोषींना वेगवेगळी फाशी देण्यात यावी. ज्या दोषींची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली आहे त्यांनी फाशी देण्यात यावी. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या