मराठवाड्यातील तगड्या काँग्रेस आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश होणार? दानवेंनी दिलं उत्तर

मराठवाड्यातील तगड्या काँग्रेस आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश होणार? दानवेंनी दिलं उत्तर

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे भाजपच्या वाटेवर आहेत.

  • Share this:

मुंबई, 5 जून : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे भाजपच्या वाटेवर आहेत. पण असं असलं तरीही सिल्लोडच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्तारांच्या भाजप प्रवेशाला विरोध आहे. यावर आता भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर सत्तारांना पक्षात घ्यायचा की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल,' अशी सावध प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले 8 ते 10 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप होणार का? या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. शिवाय, काँग्रेसमध्ये देखील खळबळ उडाली आहे. तर, राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वानं पक्षाला संपवल्याचा आरोप देखील सत्तार यांनी यावेळी केला आहे. ANI या वृत्त संस्थेशी बोलताना त्यांनी हा दावा केला.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं सत्तार नाराज होते. त्यानंतर त्यांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर

काँग्रेसचे नेते आणि विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या काही आमदारांसह खलबतं देखील केली. यावेळी भारत भालके, जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार आणि माढाचे खासदार रणजित निंबाळकर देखील हजर होते.

VIDEO: किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांसह 10 जण जखमी

First published: June 5, 2019, 10:17 AM IST

ताज्या बातम्या