सुरेश जाधव, बीड 4 जानेवारी : "शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही, आगामी लोकसभेला सध्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडेच बीडमध्ये भाजपच्या उमेदवार असतील," असं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बीड मधे पत्रकार परिषदेत सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून बीड बाबत उलट सुटल चर्चा सरू होती. त्यावर पंकजा मुंडेंनी आपली भूमिकाही स्पष्ट केली होती. आता दानवेंच्या स्पष्टिकरणामुळे बीडमधलं चित्र स्पष्ट झालं आहे.
आगामी निवडणुकीत पक्षाचा उमेदवार कोण हे ठरले का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर रावसाहेब दानवे यांनी ‘शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही, आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून सध्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे याच उमेदवार असतील हे स्पष्ट केले.
ही घोषणा करताना बाजूला खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासह भाजपचे आमदारही उपस्थित होते. त्यामुळे आता भाजपचा उमेदवार निश्चित झाला असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
बीड VIDEO: मोदींनी खरंच लोकांना 15 लाखांचा पहिला हप्ता दिला? पंकजा मुंडे म्हणतात...