नवी मुंबई, 27 मार्च, प्रमोद पाटील : नवी मुंबई ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. दिघा रेल्वे स्थानकाचं लवकरच उद्घाटन होणार आहे. सहा एप्रिलनंतर दिघा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन होणार असल्याचं अश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. माजी खासदार संजीव नाईक यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घतेली, त्यांनी दानवे यांना दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाबाबत विचारले असता सहा एप्रिलनंतर या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन होणार असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर उद्घाटन
माजी खासदार संजीव नाईक यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दिघा रेल्वे स्थानकातील सर्व कामे पूर्ण झाली असून, हे स्थानक प्रवाशांसाठी लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी नाईक यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. दरम्यान संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर लवकरच दिघा स्थानकाचे उद्घाटन करण्यात येईल असं अश्वासन रावसाहेब दानवेंकडून देण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Railways