'वर्षा'वर ठरला रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा 'मास्टरप्लान'

News18 Lokmat | Updated On: Mar 19, 2019 08:43 PM IST

'वर्षा'वर ठरला रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा 'मास्टरप्लान'

राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा गेली अनेक दिवस होती. मात्र या प्रवेशावर अंतिम मोहोर उमटली ती सोमवारी 18 मार्च रोजी.

विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील सोमवारी रात्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यांच्यासोबत भाजपचे दिग्गज नेते होते.

Loading...

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि संकटमोचक गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, हे वर्षावर उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी राजकीय स्थितीवर चर्चा केली.

मुख्यमंत्री, भाजपचे सर्व नेते आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची सविस्तर चर्चा झाली. मतदारसंघातली स्थिती, राजकीय वातावरण त्याचे परिणाम याचा आढावा सर्व नेत्यांनी घेतला.

त्यानंतर बुधवार 20 मार्च ही पक्षप्रवेशाची तारीखही ठरली. सर्व तपशील नक्की केल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह वर्षावरून अकलूजकडे रवाना झाले आणि त्यांनी मंगळवारच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपच्या प्रवेशाची घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2019 08:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...