मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप काढणार नवा पत्ता? सोलापूर जिल्ह्यातील 'या' नावाची चर्चा

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप काढणार नवा पत्ता? सोलापूर जिल्ह्यातील 'या' नावाची चर्चा

Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis along with other BJP legislators arrives to attend a meeting on the Maratha reservation issue,  at the party office in Mumbai on Thursday, August 2, 2018. (PTI Photo/Shashank Parade) (PTI8_2_2018_000146B)

Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis along with other BJP legislators arrives to attend a meeting on the Maratha reservation issue, at the party office in Mumbai on Thursday, August 2, 2018. (PTI Photo/Shashank Parade) (PTI8_2_2018_000146B)

भाजपकडून या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील एक नाव चर्चेत आलं आहे.

मुंबई, 5 मे : कोरोना संसर्ग, लॉकडाऊन या काळातही विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय धुरळा उडाला आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष या निवडणुकीत कुणाला संधी देणार आणि भाजपकडून त्यांना या निवडणुकीत कोण भिडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच भाजपकडून या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील एक नाव चर्चेत आलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र स्वत: विजयसिंह मोहिते पाटील यांनी कमळ हाती घेणं टाळलं. असं असलं तरीही मुलाच्या भाजप प्रवेशानंतर पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी कार्यकर्त्यांना भेटून व आपल्या कौशल्याने अनेक मतदारसंघात भाजपला अनुकूल भूमिका घेण्यास भाग पाडले होते.

भाजपच्या वाट्याला तीन जागा

मोहित पाटील कुटुंबीयांनी आपली ताकद दाखवत माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आणला. या बदल्यात रणजितसिंह मोहिते-पाटील यांना मंत्रिपद निश्‍चित होते. परंतु, बदलत्या राजकीय वातावरणामुळे त्यांना निवडणुकीनंतर एकही पद मिळाले नाही. परंतु येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा येत आहेत. एका जागेवर रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव निश्‍चित असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे मोहिते-पाटील गटात सध्यातरी त्यांच्या नावाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.

भाजपकडे 105 आमदार असून ते तीन जागी आपला उमेदवार सहज निवडून आणू शकतात, अशी चर्चा आहे माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी यांच्या परिवारातील कोणाला ना कोणाला भाजपने सत्तेची पदे दिलेली आहेत. तसे, मोहिते-पाटलांना भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून एकही पद मिळालेले नाही. त्यामुळे रणजितसिंह मोहिते-पाटील यांची वर्णी निश्‍चित समजली जात आहे.

कोण आहे रणजितसिंह मोहिते पाटील?

रणजितसिंह मोहिते-पाटील सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू, तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गावपातळीपर्यंत संघटन बांधण्यासाठी, वाढीसाठी प्रयत्न केले. विधानपरिषद व राज्यसभेवर अल्पकाळ काम करण्याची संधी मिळाली.

संपादन - अक्षय शितोळे

First published:

Tags: BJP, Solapur