Home /News /maharashtra /

रणजितसिंह डिसले गुरुजी Corona पॉझिटिव्ह; दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट

रणजितसिंह डिसले गुरुजी Corona पॉझिटिव्ह; दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली होती भेट

सध्या जगभरात डिसले गुरुजींची मोठी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही डिसले गुरुजींच्या कामाचं कौतुक केलं आहे.

    मुंबई, 9 डिसेंबर : युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. त्यांच्या या कर्तृत्वामुळे जगभरातून डिसले गुरुजींचं कौतुक केलं जात आहे. दरम्याम त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले (Ranjitsinh Disale,) यांचा दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला होता. त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. या सत्कार समारंभासाठी सरकारने डिसले यांच्या आई पार्वती आणि वडील महादेव डिसले यांनाही खास निमंत्रित केलं होतं आणि त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी डिसले यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना राज्य सरकार पूर्ण मदत करेल असं आश्वासनही दिलं. राज्यात प्राथमिक शिक्षणात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने एक टास्क फोर्स तयार केला आहे. त्याच्या माध्यमातून आता ‘डिसले पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात येणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus, Solapur

    पुढील बातम्या