शरद पवार पुन्हा मैदानात! बारामतीला मिळाली नवी ओळख

शरद पवार पुन्हा मैदानात! बारामतीला मिळाली नवी ओळख

बारामतीच्या बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आज पहिला रणजी सामना खेळवण्यात आला.

  • Share this:

बारामती, 12 फेब्रुवारी : शरद पवार आणि क्रिकेट यांचे जुने संबंध सर्वांना माहित आहेत. राजकारण आणि क्रिकेट या दोन गोष्टी पवारांच्या सर्वात जवळच्या आहेत. त्यामुळं क्रिकेटच्या मैदानावर शरद पवार कोण्त्या ना कोणत्या रुपात दिसत असतात. मात्र पहिल्यांदाच बारामतीच्या मैदानात शरद पवार दिसले. बारामती हे शहर पवारांचे शहर म्हणून ओळखले जाते. याच बारामतीच्या बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आज पहिला रणजी सामना खेळवण्यात आला.

बारामतीच्या क्रिकेटच्या मैदानावर पहिला रणजी सामना पाहण्याकरिता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील उपस्थित राहिल्या होत्या. या मैदानावर महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड हा रणजी सामना होत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात बीसीसीआयच्या समितीने बारामतीच्या मैदानाची पहाणी केली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाला प्रथमश्रेणी सामन्यांचा दर्जा देण्यात आला.

वाचा-दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्यांच्या सवलती बंद करा, शिवसेना खासदाराचा प्रस्ताव

वाचा-अहमदाबादला स्वागताला येतील 7 लाख लोक, भारत भेटीबद्दल भरभरून बोलले डोनाल्ड ट्रम्प

वाचा-मुंबईकर श्रेयस अय्यर विराटपेक्षा सरस! न्यूझीलंडच्या भूमीत रचले वर्ल्ड रेकॉर्ड

वाचा-सर्वसामन्यांचे जेवण महागणार! गॅस सिलिंडर 145 रुपयांनी महागले

हा सामना सुरु होण्याआधी शरद पवारांच्या हस्ते छोटेखानी सत्कार समारंभ पार पडला. यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंनी पवारांसोबत फोटोसेशनही केलं. शरद पवारांनी स्वत: सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केले. प्रथम श्रेणी क्रिकेट सामने देशांत सर्वदूर आयोजित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे कॅप्शन यावेळी पवारांनी दिले. दरम्यान महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

First published: February 12, 2020, 10:54 AM IST

ताज्या बातम्या