७ डिसेंबरची विधानपरिषद निवडणूक राणे लढणार नसल्याची शक्यता

७ डिसेंबरची विधानपरिषद निवडणूक राणे लढणार नसल्याची शक्यता

त्याऐवजी एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत राणे भाजपच्या कोट्यातून परिषदेवर जाण्याची शक्यता जास्त आहे.

  • Share this:

16 नोव्हेंबर : News18लोकमतला कळलेल्या माहितीनुसार ७ डिसेंबरला होणारी विधानपरिषद निवडणूक राणे लढणार नाहीत. या पोटनिवडणुकीत विजयासाठी राणेंची मोठी कसरत करावी लागणार आहे. त्याऐवजी एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीत राणे भाजपच्या कोट्यातून परिषदेवर जाण्याची शक्यता जास्त आहे.

नारायण राणेंनी विधान परिषद आमदारकीचा राजीनामा देऊन आता महिना उलटलाय तरीही भाजपने अजून त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही. अशातच आता त्यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक लागलीय. राणेंना कसल्याही परिस्थितीत भाजपच्या मदतीने ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे. पण अजूनही त्यांच्याकडे विजयासाठीचं पुरेसं संख्याबळ उपलब्ध नाहीये. राणेंकडील सध्याच्या मतांची बेरीज जेमतेम 137 मतांपर्यंत पोहोचतेय तर त्यांना जिंकण्यासाठी किमान 145 आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे.

नारायण राणेंची बिकट वाट

भाजप - 122

काँग्रेसची फुटणारी 2 संभाव्य मतं (नितेश राणे, कालिदास कोळंबकर)

अपक्ष - 13

एकूण - 137

जिंकण्यासाठी मतांची गरज - 145

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2017 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading