प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 27 सप्टेंबर : नारायण राणे दसऱ्याला स्वतःचा पक्ष स्थापन करणार असून, भाजप त्यांना लगेच कॅबिनेट मंत्रीही बनवणार आहे. भाजपच्या खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलीय. परवाच्या दिल्लीच्या अमित शहांसोबतच्या बैठकीत हा नवा फार्म्युला तयार झाला असून त्यात नारायण राणेंना भाजपात प्रवेश देण्याऐवजी त्यांना सदाभाऊ खोत यांच्यासारखा स्वतंत्र पक्ष काढण्यास सांगून एनडीएत सामील करून घेतलं जाणार आहे.
राणेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर त्यांना लगेच मित्रपक्ष म्हणून राज्यात कॅबिनेट मंत्री केलं जाईल. त्यानंतर राणेंच्याच रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर त्यांना निवडून आणलं जाईल. असा हा फार्म्युला ठरला आहे. भाजपच्या या नव्या फार्म्युल्याला संघ परिवारानेही हिरवा कंदिल दिल्याचं बोललं जातंय.
नारायण राणेंना भाजपात घेण्यास होणारा पक्षांतर्गत विरोध आणि शिवसेनेची संभाव्य खळखळ लक्षात घेऊन भाजपच्याच धुरीणांनी हा मध्यममार्ग सुचवल्याचं बोललं जातंय. नारायण राणेंनीही त्याला तयारी दाखवल्याचं सूत्रांकडून कळतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Narayan rane, NDA, नारायण राणे, भाजप एनडीए, मुख्यमंत्री