चिपळूण: राणे समर्थकांना काँग्रेसच्या सभेत जाण्यपासून पोलिसांनी रोखलं

चिपळूण: राणे समर्थकांना काँग्रेसच्या सभेत जाण्यपासून पोलिसांनी  रोखलं

आज हुसेन दलवाई यांच्या सभेत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तासाठी असलेले एसआरपी आणि पोलिसांची व्यवस्था करण्यात आली होती. या पोलिसांनी राणेंच्या कार्यकर्त्यांना दलवाईंच्या सभेत घुसू दिलं नाही.

  • Share this:

चिपळूण, 09 सप्टेंबर: आज चिपळूणमध्ये झालेल्या प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष हुसेन दलवाईंच्या बैठकीत घुसण्याचा अयशस्वी  प्रयत्न राणे यांच्या समर्थकांनी केला. याआधी अशाचप्रकारे राणे समर्थक सिंधुदुर्गच्या सभेत घुसले होते.

आज हुसेन दलवाई यांच्या सभेत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तासाठी असलेले एसआरपी आणि पोलिसांची व्यवस्था करण्यात आली होती. या पोलिसांनी राणेंच्या कार्यकर्त्यांना दलवाईंच्या सभेत घुसू दिलं नाही. तेव्हा पोलिसांना आपणही कांग्रेसचे कार्यकर्ते आहोत त्यामुळे बैठकीत जाणे आमचा हक्क आहे असं हे समर्थक सांगत होते. तसंच नारायण राणे कांग्रेसचे नेते असूनही  त्यांचा फोटो कॉंग्रेसच्या बैठकीच्या बॅनरवर का नाही  असा सवालही राणे समर्थकांनी विचारला. यावेळी चिपळूणच्या राणे समर्थकांनी हुसेन दलवाईंचा निषेध केला. पण चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे समर्थकांना दलवाईंच्या सभेपासून दुरच राहावं लागलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2017 04:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading