नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला नितेश राणेच गैरहजर राहणार !

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला नितेश राणेच गैरहजर राहणार !

काँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे उद्या कणकवलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय जाहीर करणार आहेत. पण त्यांच्या नियोजित पत्रकार परिषदेत आमदार पूत्र नितेश राणेच सहभागी असणार नाहीत.

  • Share this:

सिंधुदुर्ग, 20 सप्टेंबर : काँग्रेसचे बंडखोर नेते नारायण राणे उद्या कणकवलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय जाहीर करणार आहेत. पण त्यांच्या नियोजित पत्रकार परिषदेत आमदार पूत्र नितेश राणेच सहभागी असणार नाहीत. थोडक्यात राणेंनी उद्या काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर तांत्रिकदृष्ट्या आमदार म्हणून नितेश राणे या निर्णयाचा भाग असणार नाहीत. स्वतः नितेश राणेंनीच ही माहिती दिलीय. नितेश राणे आजच मुंबईच्या दिशेने रवाना देखील झालेत. उद्या मी पत्रकार परिषदेत शरीराने हजर राहू शकणार नसलो तरी मी मनाने वडीलांसोबतच आहे, असं सांगायलाही नितेश राणे विसरले नाहीत. थोडक्यात काँग्रेसकडून होणारी पक्ष निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी तर राणे पिता पुत्रांनी ही गैरहजेरी खेळी खेळली नाहीना अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नारायण राणेंच्या उद्याच्या पत्रकार परिषदेला नितेश राणेंसोबतच त्यांचे समर्थक आमदार कालिदास कोळंबकर हे देखील अनुपस्थित राहणार आहेत. याचाच सरळ अर्था असा होतो की, राणे कुटुंबीय काँग्रेस सोडणार असले तरी तांत्रिकदृष्ट्या ते कोणतेही निलंबनाची कारवाई स्वतःवर ओढवून घेऊ इच्छित नाहीत. कारण कागदोपत्री बंडखोरी केलीतर नितेश राणे आणि कालिदास कोळंबकरांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागून पोटनिवडणूक लढवावी लागेल. कदाचित त्यामुळेच राणे कुटुंबियांनी हा मधला मार्ग अवलंबला असल्याचं बोललं जातंय.

नारायण राणेंच्या या पत्रकार परिषदेला त्यांचे माजी खासदार पूत्र निलेश राणे मात्र आवर्जून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी अडीच वाजता कणकवलीत ही पत्रकार परिषद होणार आहे. काँग्रेस सोडण्याआधी भाजपकडून कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळेच कदाचित राणे कुटुंबियांना हा मध्यममार्ग स्वीकारावा लागत असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2017 07:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading