निमंत्रण नसल्यानेच राहुल गांधींच्या दौऱ्यात गेलो नाही-राणे

निमंत्रण नसल्यानेच राहुल गांधींच्या दौऱ्यात गेलो नाही-राणे

राहुल गांधींच्या नांदेड बैठकीसाठी मला निमंत्रण नव्हतं. त्यामुळे मी तिकडे गेलो नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत

  • Share this:

सिंधुदुर्ग, 8 सप्टेंबर : राहुल गांधींच्या नांदेड बैठकीसाठी मला निमंत्रण नव्हतं. त्यामुळे मी तिकडे गेलो नाही, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी पत्रकारांनी त्यांना राहुल गांधींच्या दौऱ्यात सहभागी न होण्याबद्दल छेडलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. राहुल गांधी आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर असल्याने राणे वगळता काँग्रेसचे सर्व नेते त्यांच्या दौऱ्यात सामिल झालेत तर भाजपच्या वाटेवर असलेले नारायण राणे मात्र, स्वतःच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, आज सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसच्या दोन स्वतंत्र बैठका बोलावण्यात आल्या होत्या एक बैठक राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी बोलावली होती. तर दुसरी बैठक राणे समर्थकांनी बोलावली होती. याच वादावरून राणेंनी हुसेन दलवाई यांच्यावर टीकास्त्रं सोडलंय. ''मी पक्षातला ज्येष्ठ नेता आहे, हुसेन दलवाई कोण, हुसेन दलवाईंचा सिंधुदुर्ग काँग्रेसशी काय संबंध?'' असा सवाल राणेंनी केला आहे. दलवाई कशी काय बैठक बोलावू शकतात, असंही राणे म्हणाले.

First published: September 8, 2017, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading