• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • रामदेवबाबांची होळी शेतकऱ्यांसोबत साजरी

रामदेवबाबांची होळी शेतकऱ्यांसोबत साजरी

रामदेवबाबांनी वाशिम जिल्ह्यात होळीचा सण साजरा केला. यावेळी त्यांनी किसान मेळावा घेतला.

  • Share this:
वाशिम, 02 मार्च: आज देशभर होळीचा उत्साह दिसत असतानाच   योगगुरु रामदेवबाबा  यांनी मात्र आगळ्यावेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली आहे. सगळ्या देशाचं भरणपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत वाशिममध्ये रामदेवबाबांनी होळी साजरी केली आहे. रामदेवबाबांनी  वाशिम जिल्ह्यात होळीचा सण साजरा केला. यावेळी त्यांनी किसान मेळावा घेतला.  त्यानंतर  पर्यावरणपूरक होळी साजरी केली.  तसंच रासायनिक रंगांनी होळी खेळू नका निसर्गाचा समतोल राखा असा संदेशही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी कुठल्याही रासायनिक रंगासह होळीचा सण साजरा केला नाही. तर  रामदेवबाबांनी कोरडा रंग आणि फुलांच्या पाकळ्या उधळून होळी साजरी केली. नागरिकांनी रामदेवबाबांसोबत होळीचा आनंद लुटला. रामदेवबाबांची होळी दरवर्षीच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. याशिवाय राज्यात ठिकठिकाणी होळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश  देण्यात येत आहे.
First published: