मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'आमच्यासोबत रामदास कदम सुद्धा शिवसेना सोडणार होते', निलेश राणेंचा गौप्यस्फोट

'आमच्यासोबत रामदास कदम सुद्धा शिवसेना सोडणार होते', निलेश राणेंचा गौप्यस्फोट

'रामदास कदम यांच्याकडून पक्षनिष्ठा याबद्दल  उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी अजिबात अपेक्षा ठेवू नये. ते तोंडावर सरळसरळ खोटे बोलत असतात'

'रामदास कदम यांच्याकडून पक्षनिष्ठा याबद्दल उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी अजिबात अपेक्षा ठेवू नये. ते तोंडावर सरळसरळ खोटे बोलत असतात'

'रामदास कदम यांच्याकडून पक्षनिष्ठा याबद्दल उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी अजिबात अपेक्षा ठेवू नये. ते तोंडावर सरळसरळ खोटे बोलत असतात'

महाड, 20 ऑक्टोबर : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (ramdas kadam) अडचणीत सापडले आहे. त्यानंतर आता 'आम्ही शिवसेना (shivsena) सोडली तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते, शिवसेना सोडणाऱ्या 15 जणांच्या यादीत रामदास कदम यांचे पहिले नाव होते' असा गौप्यस्फोट भाजपचे नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलत असताना निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे.

'आम्ही शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते, शिवसेना सोडणाऱ्या 15 जणांच्या यादीत रामदास कदम यांचे पहिले नाव होते. आमच्या तेव्हाच्या शासकीय बंगल्यावरून रामदास कदम बाहेर पडले, खेडमध्ये परिस्थिती बघून येतो, कार्यकर्त्यांशी बोलून येतो मग बॉम्ब टाकूया असा शब्द दिला. ते महाडजवळ आले तेव्हा त्यांना बंगल्यावरून फोन आला विरोधी पक्ष नेते पद देतो, त्यावेळी त्यांनी गाडी वळवली आणि 'मातोश्री'ला गेले आणि पद घेतलं. हेच रामदास कदम नेहमी पक्षाच्या विरोधात काम करत आलेत, असा खुलासा निलेश राणे यांनी केला.

व्वा! 'मेरे सपनो की रानी' गाणं काय वाजवलंय; मुंबई पोलीस बँडचा जबरदस्त VIDEO

रामदास कदम यांच्याकडून पक्षनिष्ठा याबद्दल  उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी अजिबात अपेक्षा ठेवू नये. ते तोंडावर सरळसरळ खोटे बोलत असतात. भाजपच्या नेत्यांना विचारा की, कुणाला कधी आणि केव्हा भेटले ते सांगू शकतात. कदम हे जगात सर्वात खोटे बोलणारे आहे, ते कुणाचीही शपथ खाऊन खोटं बोलू शकतात. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी सर्व सेटलमेंटची काम केली आहे, अशी टीकाही राणे यांनी केली.

'यांना मस्ती आलीये, कुठे हनिमून सुरू आहे?' अमृता फडणवीसांची देशमुखांवर टीका

'महाराष्ट्र आता रामदास कदम विरोधी पक्षनेता होता हे विसरले आहे, बाहेर येऊन त्यांनी नारायण राणे यांच्यावर फक्त टीका केली, आता कदम हे ७० वयाचे झाले आहे. त्यांनी आता खरं बोललं पाहिजे, खोटे बोलणे सोडून द्यावे, अनिल परब यांच्याविरोधात कोण आहे, हे सर्वांना माहिती आहे, असंही राणे म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Nilesh rane