शिवसेनेला महाराष्ट्रात आव्हान दिलं तर गाडून टाकू - रामदास कदम

शिवसेनेला महाराष्ट्रात आव्हान दिलं तर गाडून टाकू - रामदास कदम

'मोदींची लाट असताना महाराष्ट्रात शिवसेनेचे 63 आमदार निवडून आलेत. आता तर त्यांचं काहीच नाही.'

  • Share this:

मुंबई 8 जानेवारी : महाराष्ट्रात येऊन कुणी शिवसेनेला आव्हान देऊ नये, असं झालं तर आम्ही त्यांना गाडून टाकू असा इशारा शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दिला आहे. अमित शहांच्या लातूर इथल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हा इशारा दिला. मोदींची लाट असताना महाराष्ट्रात शिवसेनेचे 63 आमदार निवडून आलेत. आता तर त्यांचं काहीच नाही असा टोला त्यांनी लगावला.

रामदास कदम हे पर्यावरण मंत्री आहे. भाजपसोबत सरकारमध्ये असताना शिवसेनेचे मंत्री जर भाजप आणि त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांबद्दल असे वक्तव्य करत असतील तर दोनही पक्षांमधला वाद किती टोकाला गेला आहे हे दिसून येतं.

काय म्हणाले होते अमित शहा?

राज्यात युती झाली तर ठिक, नाहीतर विरोधियोंको 'पटक' देंगे  असा इशारा भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिला रविवारी लातूर इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना दिला होता. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ कसं जिंकता येईल ते बघावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांनी केलं. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वबळाचा नारा दिला.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युती बाबात एक मोठं विधान केलंय. राज्यात युतीचा निर्णय हा भाजपचे अध्यक्ष अमित शहाच घेतील असं ते म्हणाले. "महाराष्ट्रात युती होणार की नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी करू नये तर त्यांनी कामाला लागावं. राज्यातल्या 48 पैकी 40 जागा जिंकण्याची तयारी ठेवावी." असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

भाजपच्या या दोन मोठ्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय क्षेत्रात वादळ निर्माण झालं आहे. ते थांबण्याचं चिन्ह दिसत नसून नेत्यांच्या नेत्यांच्या या नव नव्या वक्तव्यांमुळे त्या आगीत आणखी तेल ओतलं जात आहे.

VIDEO : पुण्यात दारूच्या बाटलीत चहाचं पाणी ठेवून हेल्मेटचं घातलं श्राद्ध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 03:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading