रत्नागिरी, 19 मार्च : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आज खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर रामदास कदम बोलत होते. उद्धव ठाकरे हे अफजलखानासारखे माझ्यावर चालून आले, मला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले रामदास कदम
उद्धव ठाकरे अफजलखानासारखे माझ्यावर चालून आल्याचं कदम यांनी म्हटलं आहे. कोकणी जनता कोणाच्या पाठीशी आहे हे पहावं, आजची सभा ही विरोधकांना प्रत्युत्तर असेल. उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी हेच खरे गद्दार आहेत. आज शिमगा होणार नसून ही सभा विकासाची आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकणच्या विकासाची दिशा जाहीर करतील असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
बावनकुळेंच्या युटर्न नंतर चंद्रकांत पाटलांचा बाउन्सर; शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत मोठा खुलासा
उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
यावेळी बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच आपण एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. दापोली विधानसभा मतदार संघात माझे वेळोवेळी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आपण विकास कामाच्या रूपाने त्यांना प्रत्युत्तर देत आहोत. दापोली विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोट्यवधींची विकास कामे झाल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Ramdas kadam, Ratnagiri, Shiv sena, Uddhav Thackeray