दापोली, 18 सप्टेंबर : आदित्य ठाकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे 100 कोटी रुपये घेतले, असा खळबळजनक आरोप काल रामदास कदम यांनी केला होता, यानंतर आता आज पुन्हा एकदा कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'आदित्य ठाकरे खोके खोके करत फिरत आहेत. कोण गद्दार? आदित्य ठाकरे गद्दार. कोणाला गद्दार म्हणताय,' अशी टीका रामदास कदम यांनी केली.
'प्लास्टिक बंदीचा कायदा केला, पण आदित्य ठाकरे कायदा मी केला म्हणतात. खरा गद्दार आदित्य ठाकरे आहे, त्यांनी मला संपवण्याचं काम केलं. मातोश्रीवर मिठाईचे खोके जातात, तुम्ही कुणाला खोके सांगतायत. खोके, खोके, बोके कुणाला म्हणता? हळू हळू सगळं बाहेर पडेल', असा पलटवार रामदास कदम यांनी केला आहे.
पुन्हा 100 कोटींचा आरोप, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंवर मोठा बॉम्ब
'उद्धव ठाकरे, माझा मुलगा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडला, असं बाळासाहेबांना वाटत असेल. बाळासाहेबांनी जे कमावलं ते सगळं उद्धव ठाकरेंनी गमावलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते, मात्र एका दिवसात निर्णय बदलला. एकनाथ शिंदे यांना फसवलं गेलं. उद्धव ठाकरेंचं योगदान काय? बाळासाहेबांचा मुलगा म्हणून सांगावं का लागतं?,' असा सवाल रामदास कदम यांनी विचारला.
'महाविकासआघाडी सरकारमध्ये शिवसेनेला 16 टक्के, राष्ट्रवादीला 57 टक्के निधी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असूनही सगळ्यात जास्त निधी त्यांना. अडीच वर्ष मंत्रालयात गेले नाहीत. तुम्ही लोकांना न्याय दिला नाहीत,' अशी टीका रामदास कदम यांनी केली.
'भास्कर जाधव बाडगा आहे, नेतेपद मिळाल्याने माझ्यावर टीका केली. माझ्यावर टीका करायला त्याची लायकी आहे का? भास्कर जाधव यांना 95 मध्ये मी तिकीट द्यायला लावलं. अनंत गिते यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. आता तुम्ही तटकरेंचं काम करणार का?,' असा टोलाही रामदास कदम यांनी हाणला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya Thackeray, Ramdas kadam, Shivsena, Uddhav Thackeray