'अमित शहांनी सांगितलंय, राज्यात भाजप-सेनेचं सरकार येणार'

'अमित शहांनी सांगितलंय, राज्यात भाजप-सेनेचं सरकार येणार'

राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक होणार आहे. भाजपने मात्र अजुनही वेट अँड वॉच अशीच भूमिका घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राज्यात सुरु झालेला सत्ता स्थापनेचा संघर्ष अजुनही सुरुच आहे. कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेचा दावा करता न आल्यानं अखेर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानतंर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरु झाल्या आहेत. यातच भाजपकडून पुन्हा आमचंच सरकार येणार असं म्हटलं जातं आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एएनआय या वृत्त संस्थेशी बोलताना सांगितलं की, राज्यातील सरकार स्थापनेवरून जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये लक्ष घालावं अशी विनंती भाजपाध्यक्ष अमित शहांना केली. त्यावर अमित शहांनी सांगितलं की काळजी करू नका सर्व ठिक होईल. भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करतील. रामदास आठवले यांनी असं सांगितलं असलं तरी राज्यात आणि केंद्रातील स्थिती मात्र वेगळीच आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि सेनेच्या नेत्यांमध्ये चर्चेची कोणतीच चिन्हे नाहीत. तर रविवारी भाजपकडूनच सेना एनडीएतून बाहेर पडल्याचं सांगण्यात आलं आहे.

निवडणूकपूर्व युती करून भाजप-सेनेनं एकत्र निवडणुका लढवल्या. 2014 च्या तुलनेत कमी जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्याकडे बहुमत होतं. मात्र, सेनेनं मुख्यमंत्रिपदावर ठाम भूमिका घेतली. भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांच्याकडे जादुई आकडा नसल्यानं सत्ता स्थापन करू शकला नाही. त्यानंतर शिवसेनेलाही सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रण दिलं. पण त्यांना पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात काही ठरलं नसल्यानं पत्र मिळण्यास उशिर झाला. सेनेनंतर राष्ट्रवादीलाही राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी बोलावलं होतं. राष्ट्रवादीनेही वेळ वाढवून मागितली मात्र त्याला नकार देत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीसाठी शिफारस केली.

राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? जयंत पाटलांनी केला खुलासा

राज्यात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ मुख्यमंत्रिपदाच्या वादामुळे या दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्याच मुख्यमंत्रिपदावरून आता महाशिवआघाडीतही मतभेद सुरू आहेत. राष्ट्रवादीने शिवसेनेकडून मुख्यमंत्रिपदाबाबत 50-50 च्या फॉर्म्युल्याची मागणी केली आहे. मात्र पूर्ण पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री हवा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे या संभाव्य आघाडीत पेच निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार का? 20 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते...

First published: November 18, 2019, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading