रामदास आठवलेंना पाहताच जागा झाला पोलिस शिपाईमधला कवी.. ऐकवली कविता

रामदास आठवलेंना पाहताच जागा झाला पोलिस शिपाईमधला कवी.. ऐकवली कविता

रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सध्या लातूर जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी सायंकाळी लातूर गाठलं आणि एका आलिशान हॉटेलात मुक्काम केला.

  • Share this:

लातूर, 12,मे- रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सध्या लातूर जिल्ह्यात दुष्काळी दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी सायंकाळी लातूर गाठलं आणि एका आलिशान हॉटेलात मुक्काम केला. त्यानंतर रविवारी सकाळी औसा तालुक्यातल्या जयनगर गावात त्यांनी एका घराच्या ओट्यावर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दरम्यान, महाकवी आठवलेंना पाहताच ड्युटीवर असलेल्या पोलिसातला कवी जागा झाला. पोलिस शिपाईने थेट आठवलेंनाच कविता ऐकवली.

आठवलेंचा दुष्काळ दौरा कवितेमुळं गाजला..

लातूर जिल्ह्यातल्या जयनगर गावात बैठक घेऊन आठवलेंनी दुष्काळ दौरा आटोपला. तुमचा पक्ष कोणता? असा सवाल थेट आठवलेंनी व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्यालाच केला. आपली व्यथा मांडण्यासाठी एका शेतकऱ्यानं माईक हातात घेताच तुमचा पक्ष कोणता? असा प्रश्न आठवलेंनी केला व नंतर त्या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं. कोणत्याही ठिकाणची पाहणी न करता रामदास आठवले यांनी दौरा आटोपला आणि ते निघताच एका पोलीस शिपायाने आठवलेंच्या समोर कविता म्हणून दाखवली. त्याच्या कवितेला 'वाह वाह' अशी दाद दिली. एवढेच नाही तर जाता जाता आठवलेंनी त्यांची लेटेस्ट कविता देखील सादर केली. केंद्राची आणि राज्याची मदत आणि दुष्काळ निवारणासाठी आपण पंतप्रधानांसोबत चर्चा करण्यात असल्याचं देखील रामदास आठवलेंनी यावेळी सांगितलं.

VIDEO:राजकारणाच्या मैदानातील 'सामना', मतदानानंतर गौतम गंभीर म्हणतो...

First published: May 12, 2019, 2:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading