जयपूर, ता. 16 सप्टेंबर : आपल्या वक्तव्यांमुळं कायम चर्चेत राहणारे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री आणखी एका वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. देशभर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे तीव्र असंतोष असताना आठवले म्हणाले मी मंत्री असल्याने पेट्रोल आणि दरवाढीचा मला फटका बसत नाही. कारण मला सगळचं मोफत मिळतं. माझं मंत्रीपद गेलं तर मात्र मला त्याची झळ बसेल. त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होतेय. नंतर सावरून घेत आठवलें म्हणाले या दरवाढीची सामान्य माणसांना झळ बसत असल्याने केंद्र सरकारने तेलाचे दर कमी केले पाहिजे. राजस्थानमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं.
मंत्रीपदावर गेल्यानं सामन्य जनतेशी संपर्क तुटतो अशी टीका कायम राजकारण्यांवर केली जाते. रामदास आठवले यांचं हे वक्तव्य म्हणजे त्याचच उदाहरण असल्याची टीका आता आठवलेंवर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये असंतोष आहे.
आजही वाढले तेलाचे भाव
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आजही कायम आहे. रविवारी पेट्रोलच्या दरात २८ पैसे तर डिझेलच्या दरात १८ पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचे दर ८९ रुपये २९ पैसे, तर डिझेल ७८ रुपये २६ पैशांवर गेलंय. शनिवारीही पेट्रोल ३४ पैशांनी महागलं होतं. म्हणजे शुक्रवारच्या तुलनेत आज पेट्रोल एक रुपयानं वाढलंय. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तेलाचे दर कमी होत नाहीयेत, आणि केंद्र आणि राज्य सरकारं कर कमी करत नाहीयेत.. त्यामुळे सामान्य माणसाला इंधन दरातून दिलासा मिळत नाहीये.
आंध्र प्रदेश, राजस्थान या राज्यांनी तेलावर राज्य सरकार लावत असलेल्या टॅक्समध्ये कपात केल्यानं नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. तर राज्य सरकार तेलाच्या किंमती कशा कमी करता येतील याचा आढाव घेत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.
लवकरच किंमती आटोक्यात - शहा
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी, तसेच रुपयाची घसरण थांबवण्याच्या दृष्टीने काय उपाय करता येईल यावर विचार सुरू असून केंद्र सरकार लवकरात लवकर तोडगा काढेल, असे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. तेलाच्या वाढत्या किमतीमागे आंतरराष्ट्रीय कारणे असल्याचेही ते म्हणाले.
I'm not suffering from rising fuel prices as I am a minister. I may suffer if I lose my ministerial post. It's understandable that people are suffering from rising fuel prices & it's the duty of the govt to reduce them: Union Minister Ramdas Athawale in Jaipur #Rajasthan. (15.09) pic.twitter.com/H4F7e7Zhqt
— ANI (@ANI) September 15, 2018
VIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.