महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही कायम? आठवल्यांना हवी पुण्यातली जागा

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही कायम? आठवल्यांना हवी पुण्यातली जागा

महायुतीच्या जागावाटपात रामदास आठवलेंच्या रिपाइंला (RPI) मुंबईतली एक जागा मिळाली आहे. पण पुण्यातलीही एक जागा मिळावी यासाठी आठवले आग्रही आहेत.

  • Share this:

मुंबई, 2 ऑक्टोबर : महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला आता हळूहळू उलगडतो आहे, असं वाटत असतानाच महायुतीतल्या सर्वच पक्षातून कुरबुरी ऐकू येऊ लागल्या आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने त्यांच्या वाट्याला आलेल्या 6 जागांची बुधवारी घोषणा केली. त्यापैकी 4 जागांवरचे उमेदवारही जाहीर केले. रामदास आठवले यांना मुंबईतली एक जागा मिळाली आहे. पण पुण्यातलीही एक जागा मिळावी यासाठी ते आग्रही आहेत. माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी, अशी सूचना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

महायुतीच्या जागावाटपात रिपाइंला मिळालेल्या जागा आणि उमेदवार

मानखुर्द शिवाजीनगर (मुंबई) - गौतम सोनावणे

फलटण (सातारा) : दीपक निकाळजे

पाथरी (परभणी) : मोहन फड

नायगाव (नांदेड): राजेश पवार

माळशिरस (सोलापूर)

भंडारा (विदर्भ)

छोटा राजनच्या भावाला उमेदवारी

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे (Chota rajan) बंधू दीपक निकाळजे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (आठवले गट) RPI उमेदवारी देण्यात आली आहे. ते फलटणहून निवडणूक लढवतील आणि विशेष म्हणजे ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. रिपाइंला मिळालेल्या 6 जागांपैकी दीपक निकाळजे (deepak nikalje) यांना फलटणची जागा देण्यात आली आहे.

VIDEO 'पाठीत खंजीर खुपसला तरी चालेल पण भाजपचा विजय असो', मेधा कुलकर्णी झाल्या भावुक

मुंबईतली एक जागा रिपाइंला मिळाली आहे. त्या जागी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दीपक निकाळजे लढणार कमळाच्या चिन्हावर

शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून दीपक निकाळजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रिपाइंचे सर्व उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. दीपक निकाळजे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजपमध्ये पहिली मोठी बंडखोरी; नाशिकमध्ये 14 नगरसेवकांचा राजीनामा

नवाब मलिक यांनी 'मोदींच्या टीम मध्ये दाऊदचा माणूस आहे', अशी टीका केली. 'गुजरातमध्ये जसं गुंडांना पोसलं जात तसं महाराष्ट्रमध्येही होत आहे', असंही ते म्हणाले.

मानखुर्दसह 6 जागा आठवलेंकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील 3 दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय होऊन भाजप शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या ६ जागा अधिकृत सोडण्यात आल्या आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण ;सोलापुरातील माळशिरस ; विदर्भात भंडारा ; मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव; परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा रिपाइंला सोडण्यात आल्या असल्याची अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

हेही वाचा - आदित्य ठाकरेंचा 'केम छो'च्या डावावर विरोधकांचा 'मराठी' बाणा... असं रंगलं राजकारण

------------------------------------------------------------------

VIDEO : आदित्य यांच्या उमेदवारीवर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बोलले, म्हणाले...

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 2, 2019, 9:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading