रामदास आठवले म्हणतात, 'प्रत्येकाच्या खात्यात लवकरच येणार 15- 15 लाख'

रामदास आठवले म्हणतात, 'प्रत्येकाच्या खात्यात लवकरच येणार 15- 15 लाख'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यात 15- 15 लाख रुपये जमा व्हायला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठीच RBIशी बोलणी सुरू आहेत, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं.

  • Share this:

सांगली, 18 डिसेंबर : लवकरच प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी सांगितलं होतं की भाजपचं सरकार सत्तेवर आलं, तर ते काळ्या पैसा भारतात परत आणतील आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 15 लाख रुपये जमा करतील. मोदींच्या या आश्वासनाी विरोधकही नेहमी खिल्ली उडवत असतात. पण RPI चे नेते आणि खासदार रामदार आठवले यांनी मात्र अशी योजना आहे आणि 15 लाख नागरिकांच्या खात्यावर जमा व्हायला हळूहळू सुरुवात होईल, असं सांगितलं.

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये बोलताना आठवले म्हणाले की, प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन सरकार पूर्ण करणार आहे, पण त्यासाठी सरकारकडे तेवढे पैसे नाहीत. म्हणून सरकार रिझर्व बँकेकडे पैसे मागत आहे. पण RBI ते पैसे द्यायला तयार नाही. त्यात तांत्रिक अडचणी आहेत. म्हणून एकदम हे पैसे जमा होणार नाहीत, तर हळूहळू होतील असंही आठवले म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या वेळी दिलेल्या या आश्वासनाचं काय झालं हे विचारणारी याचिकाही एका नागरिकानं दाखल केली होती. काळा पैसा परत आला का, किती आला याबाबतही विरोधक सरकारकडे विचारणा करत असतात.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आणि भाजपचे मोठे नेते नितीन गडकरी यांनी याबाबत बोलताना एकदा स्पष्टपणे सांगितलं होतं की, 15 लाख रुपये जमा करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. ते शक्य नाही, असंही ते म्हणाले होते.

VIDEO : मोदी नको भाजपचं आता नेतृत्व गडकरींकडे द्या, सरसंघचालकांना पत्र

First published: December 18, 2018, 1:30 PM IST

ताज्या बातम्या