आता भाजपचा हा 'रम्या' पाजणार विरोधकांना डोस, पवारांवर म्हणाला...!

आता भाजपचा हा 'रम्या' पाजणार विरोधकांना डोस, पवारांवर म्हणाला...!

निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विरोधकांवर शरसंधान साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता एक वेगळाच फंडा सोशल मीडियाद्वारे वापरण्याचं ठरवलं.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 21 सप्टेंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच सगळ्याच पक्षात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यातच मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी राजकीय पक्ष हे कायमच वेगवेगळे फंडे वापरत असतात. भाजपनेही सोशल मीडियाचा वापर करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसविरोधात मोठं कँपेन सुरू केलं आहे.

निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विरोधकांवर शरसंधान साधण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आता एक वेगळाच फंडा सोशल मीडियाद्वारे वापरण्याचं ठरवलं. हा नवा फंडा असणारे 'रम्याचे डोस'. रम्याचे डोस या सदराद्वारे विरोधकांचा प्रेमाने अर्थातच उपहासात्मक पद्धतीने समाचार घेतला जाणार आहे. गेल्या 15 वर्षात आघाडी सरकारचा कारभारावर टीका आणि निवडणुकीच्या धामधुमीत धमाल उत्तरं हा रम्या प्रेमाने देणार आहे. यासाठी भाजपकडून एक टीम तयार करण्यात आली असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे.

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रम्या नावाचं एक पात्र तयार केलं आहे. हे पात्र फक्त सोशल मीडियावर असणार आहे. या रम्याद्वारे भाजप विरोधकांवर टीका करणार आहेत. यासंदर्भात भाजपने एक ट्वीटही केलं होतं.

'नमस्कार मंडळी,

तुम्हा-आम्हापैकी एक असलेला रमेश उर्फ 'रम्या' पुढील काही दिवस आघाडी सरकार व त्यांच्या मित्र पक्षांवर असलेल्या प्रेमाची उजळणी करणार आहे. आपल्या प्रेमाचे डोस पाजण्यासाठी '#रम्याचेडोस' च्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे.

नक्की वाचा!'

असं भाजपने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. खरंतर विरोधक या रम्याला कसं उत्तर देणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

VIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 07:47 PM IST

ताज्या बातम्या