राधाकृष्ण विखे-पाटील आणि राम शिंदे पहिल्यांदाच आले समोरासमोर, नाराजी दूर झाली का?

राधाकृष्ण विखे-पाटील आणि राम शिंदे पहिल्यांदाच आले समोरासमोर, नाराजी दूर झाली का?

अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा देवेंद्र फडणवीस आणि विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे हे पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले.

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षात वाढलेल्या नाराजीवर मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संघटन मंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे हे पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले.

भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या बैठकीमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्यामुळे पराभव झाल्यानं नाराजी व्यक्त केली होती. त्याबद्दल काही प्रश्न होते ते बैठकीत त्यांनी विचारले. त्यावर उत्तरे मिळाली असल्याचंही राम शिंदे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

राम शिंदे म्हणाले की,  विखे पाटील आणि आम्ही पहिल्यांदाच समोरासमोर आलो. दोघांनीही पक्षासमोर एकमेकांची भूमिका मांडली. आता यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. अहमदनगर जिल्हा कोअर कमिटीचे सदस्य आणि प्रदेश नेतृत्व यांच्यात चर्चा झाली. विधानसभा निवडणूकीसह जिल्हा परिषदेबाबत तासभर चर्चा झाली.

विधानसभा निवडणुकीत जे काही झालं त्याबद्दल सर्व उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेतलं आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून आमचं समाधान झालं आहे. आता यावर विजय पुराणिक हे भाजपचे संघटन मंत्री अहवाल सादर करतील आणि त्यानंतर पुढची कार्यवाही करतील असंही राम शिंदे यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कोअर कमिटीची बैठक उद्या नगरमध्ये होणार आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे उपस्थित असणार आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत बोलताना राम शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीला रोखायचं असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. तसेच सुजय विखे पाटील यांनी माझी आई अजुन काँग्रेसमध्येच असं वक्तव्य केलं होतं ते त्यांची आई काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्यानं केलं असावं असंही राम शिंदे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 27, 2019 03:08 PM IST

ताज्या बातम्या