अयोध्येतील राम आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात, भिडे गुरुजींची मागणी

अयोध्येतील राम आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात, भिडे गुरुजींची मागणी

'कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी-दसऱ्या प्रमाणे साजरा करावा'

  • Share this:

सांगली, 03 ऑगस्ट : 'कोरोनाला न घाबरता राम मंदिर भूमिपूजन सोहळा तमाम हिंदू समाजाने दिवाळी-दसऱ्या प्रमाणे साजरा करावा' असे आवाहन  शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे. तसंच, 'मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम लक्ष्मणच्या मूर्त्यांना मिश्या असाव्यात, अशी विनंतीही भिडे यांनी केली आहे. त्याचबरोबर 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण नसेल तरीही त्यांनी अयोध्येला जावे', असा सल्ला भिडे गुरुजी यांनी दिला आहे.

5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर भूमी पूजन सोहळ्याबाबत आज सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अजितदादांना राखी बांधताना घडला गंमतीशीर प्रकार, सुळेंनाही आवारले नाही हसू, VIDEO

'500 वर्षांपासून अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा प्रयत्न सुरू होता आणि आता तो साकारला जात आहे. ही देशातील तमाम हिंदू समाजासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे देशातील हिंदू समाजाने  सध्या कोरोनाची  परिस्थिती जरी असली तरी न घाबरता दिवाळी आणि दसऱ्या प्रमाणे हा सोहळा साजरा करावा आणि  प्रत्येकाने यानिमिताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजनही करावे', असे आवाहनही संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे.

तसंच भिडे गुरुजींनी यावेळी शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाबद्दल केलेल्या विधानावर भाष्य केले.  'शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाने अशा या पवित्र सोहळ्याला विरोध योग्य नाही, तसेच रेल्वे सुरू करून आणि बाकीच्या गोष्टी करून करून जाणार आहे का? असा सवाल करत शरद पवारांना जरी निमंत्रण नसले तरी त्यांनी अयोध्येला गेलं पाहिजे', असा सल्ला भिडेंनी दिला.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाबद्दल भिडे गुरुजींनी कौतुक केले आहे. 'उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व अत्यंत चांगले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची कामगिरी उत्तम राहिली आहे. त्यांनी आता महाराष्ट्रभर फिरून काम केले पाहिजे. कुणाच्या काही अडचणी असतील त्या दूर केल्या पाहिजे', असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

तलाव एक जलपूजन 2 वेळा, भाजप नेत्यांचा अशीही चमकोगिरी!

तसंच, 'शिवसैनिकांनी ऑनलाइन भूमिपूजन करण्याची केलेली मागणी बाळासाहेब ठाकरे यांना आवडली नसती. उद्धव ठाकरे यांना जरी अयोध्येत भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण नसले तरीही त्यांनी तिथे गेले पाहिजे. कारण की, त्यांना कोणत्याही नियंत्रणाची गरज नाही' असं मतही भिडेंनी व्यक्त केले.

त्याचबरोबर भिडे गुरुजींनी यावेळी राम मंदिर समितीला आवाहन करताना मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या राम-आणि लक्ष्मणाच्या मूर्तीला मिश्या असाव्यात, अशी विनंती केली आहे.

Published by: sachin Salve
First published: August 3, 2020, 2:32 PM IST

ताज्या बातम्या