राम कदम यांचा 'तो' मोबाईल नंबर डायल केल्यावर बघा काय झालं, पहा VIDEO

राम कदम यांचा 'तो' मोबाईल नंबर डायल केल्यावर बघा काय झालं, पहा VIDEO

दहीहंडीच्या कार्यक्रमात ज्या नाट्यमय पद्धतीने त्यांनी जो मोबईल नंबर दिला. तो नंबर आता नॉट चिरेबल आहे.

  • Share this:

मुंबई, ता.5 सप्टेंबर : डॅशिंग आणि दयावान आमदार अशी जाहिरात करणारे भाजपचे आमदार राम कदम तरूणींबद्दल केलेल्या विधानामुळं चांगलेच अडचणीत आले आहेत. सोमवारी दहीहंडीच्या कार्यक्रमात राम कदम यांनी सर्वांना जाहीरपणे आपला मोबाईल नंबर दिला आणि तुम्हाला कुठलही काम असेल तर मला सांगा मी मदतीसाठी धावून येईल असं सांगितलं. तुम्हाला मुलगी पसंत आहे, पण ती नाही म्हणत असेल तर मला सांगा मी तिला पळवून आणून ती मुलगी तुम्हाला देईन असं राम कदम म्हणाले आणि त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. हा स्त्रीयांचा अपमान आहे असा आरोप करत महिला संघटनाही त्यांच्याविरूद्ध तुटून पडल्या. ज्या नाट्यमय पद्धतीने त्यांनी जो मोबईल नंबर दिला. तो नंबर आता नॉट रिचेबल आहे. त्यांची प्रतिक्रीया जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना फोन करण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र तो फोन सध्या नॉट रिचेबल आहे.

राम कदम यांच्या ऑफिसमध्येही ठळक अक्षरात हा त्यांचा नंबर लावलेला असतो. मतदार संघातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हा नंबर सर्वांसाठी जाहीर करण्यात येतो असा कदम यांचा दावा कायम दावा असतो. त्यांचे सहायक हा नंबर उचलतात आणि लोकांच्या तक्रारी ऐकतात असा त्यांचा दावा आहे. मात्र या प्रकरणानंतर पहिल्यांदाच हा नंबर बंद ठेवण्यात आल्याचा बोललं जातंय.

या घटनेनंतर त्यांच्यावर सोशल मीडियातूनही प्रचंड टीका झाली आणि तो मोबाईल नंबर व्हायरल झाला. त्यामुळं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून त्या क्रमांकावर फोन जायला लागले. महाराष्ट्रात प्रकरण तापल्याने त्यांनी तो नंबर बंद केला असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

पुण्याच्या एका तरूणीने तर राम कदम यांना खुलं आव्हानच दिलंय. मी मुंबईत येते मला फक्त हात लावूनच दाखवा. मी तुमच्या फोनची वाट बघतेय असा व्हिडिओ काढून तिने सोशल मीडियावर टाकला आणि तीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

सर्वच विरोधी राजकीय पक्षांनी राम कदम यांच्या विरोधात आंदोलनं केलीत तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर थेट पत्रकार परिषद घेऊन राम कदम यांच्यावर घणाघाती टीका केली. आणखी काही दिवस हे प्रकरण असंच राहण्याची शक्यता असून राम कदमांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

VIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान

First published: September 5, 2018, 9:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading