मुंबई 5 फेब्रुवारी : जुहू परिसरात सोनू सूदच्या मालकीची 6 मजली इमारत आहे. ही रहिवासी इमारत असूनदेखील या इमारतीमध्ये सोनू सूदने (Sonu Sood) परवानगी न घेता हॉटेल सुरू केलं असा आरोप बीएमसीने (BMC) केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) सोनू सूदला याप्रकरणी दिलासा दिला आहे. न्यायालयाने सोनू सूद विरोधात सध्या कोणतीही कारवाई केली जाऊ नये असे आदेश पालिकेला दिले आहेत.यावर आता भाजप नेता राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली असून न्यायालयानं दिलेला निकाल राज्य सरकारला जोरदार चपराक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते राम कदम म्हणाले, की राज्य सरकारनं सोनू सूदविरोधात कारवाई केली, कारण त्यानं शिवसेना सरकारचं अपयश दाखवून दिलं. कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारचं कर्तव्य होतं, त्यांनी प्रवाशी आणि इतर लोकांची काळजी घ्यायला पाहिजे होती. मात्र, सरकारचं हे कर्तव्य सोनू सूदसारख्या लोकांनी पूर्ण केलं.
कदम म्हणाले, की कोरोना संकटाच्या काळात सोनू सूदनं लोकांची मदत केली. यामुळे, सरकारचं अपयश लोकांसमोर आलं. याच कारणामुळे, सोनू सूदला अद्दल घडवायची असं ठरवूनच शिवसेनेनं सोनू सूदविरोधात हे काम केलं. राम कदम यांना विचारण्यात आलं, की ही कारवाई तर बीएमसीनं तांत्रिक आधारावर केली होती. तेव्हा ते म्हणाले, की हे पूर्ण प्रकरण सोनू सूदला त्रास देण्यासाठी उभं केलं गेलं. जेव्हा सोनू सूदचं हॉटेल कोविड सेंटर म्हणून वापरलं गेलं तेव्हा बीएमसीला त्यात काहीच कमी दिसली नाही. मात्र, काम संपताच बीएमसीला त्यात दोष दिसू लागले.
सोनू सूद म्हणाला न्यायाचा विजय झाला -
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सोनू सूदनं ट्वीट करत म्हटलं, की न्यायाचा विजय झाला आहे. सोबतच त्यानं हेदेखील स्पष्ट केलं, की तो नेहमी कायद्याच्या चौकटी राहूनच काम करतो. पुढे सोनूनं लिहिलं, की सर्वोच्च न्यायालयानं मला बरोबर निर्णय घेण्यासाठी वेळ दिला आहे. मी जी काही कामं केली ते अधिकृतरित्याच केली, मात्र ती चुकीच्या पद्धतीनं दाखवली गेली. मला नेहमीच न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे आणि मी नेहमी काद्याचं पालनही केलं. मी नेहमी माझे काम कायद्याच्या चौकटी राहूनच करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ram kadam, Sonu Sood, Supreme court