मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तुम्ही पुतळा हटवला! पण...वेळीच जागे व्हा, छत्रपती संभाजी राजेंचा कानड्यांना सज्जड इशारा

तुम्ही पुतळा हटवला! पण...वेळीच जागे व्हा, छत्रपती संभाजी राजेंचा कानड्यांना सज्जड इशारा

तुम्ही पुतळा हटवला! परंतु जनमाणसांच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवरायांना लोकांच्या मनातून हटवू शकणार नाही.

तुम्ही पुतळा हटवला! परंतु जनमाणसांच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवरायांना लोकांच्या मनातून हटवू शकणार नाही.

तुम्ही पुतळा हटवला! परंतु जनमाणसांच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवरायांना लोकांच्या मनातून हटवू शकणार नाही.

मुंबई, 9 ऑगस्ट: 'तुम्ही पुतळा हटवला! परंतु जनमाणसांच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवरायांना लोकांच्या मनातून हटवू शकणार नाही. महाराजांचा सन्मान हा संपूर्ण हिंदुस्थानची जनता करते. बेळगावच्या शिवभक्तांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे.', अशा शब्दांत खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी ट्वीट करत बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाकट्या तेजसला वाढदिवसानिमित्त दिलं अनोखं गिफ्ट

कर्नाटक सरकारने वेळीच जागे व्हावे. शिवछत्रपतींच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करावी. कर्नाटक सरकारने चूक सुधारावी, असा सज्जड इशारा देखील खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. एवढंच नाही तर या देशाची संस्कृती टिकली ती महाराजांमुळे. कधीकाळी संपूर्ण कर्नाटक महाराजांच्या घोड्यांच्या टापाखाली आला होता, आज कर्नाटक जरी वेगळं राज्य असलं तरी आपली संस्कृती एकच आहे, याबाबतही खासदार संभाजी राजे यांनी कर्नाटक सरकारला आठवण करून दिली आहे.

आपण सर्व जण भारतीय आहोत. आपण सर्वांनी भारतियत्वाची भावना जोपासली पाहिजे, ती वाढवली पाहिजे. शिवछत्रपती हे राष्ट्रभावनेचे मूलाधार आहेत. कर्नाटकातले देश बांधव सुद्धा महाराजांवर प्रेम करतात हा आमचा अनुभव आहे, असंही संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

अखेर कर्नाटक सरकार आलं भानावर...

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात 5 ऑगस्टला बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला होता. या घटनेचे महाराष्ट्रभर पडसाद उमटल्यानंतर आता कर्नाटक सरकार भानावर आलं आहे. मनगुत्ती येथे हटवण्यात आलेला पुतळा पुन्हा बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन बेळगाव जिल्हा प्रशासनानं दिलं आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता करून 8 दिवसांत पुतळा बसवण्याचा बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील 8 दिवसांत ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात बैठक होणार असून पुतळा बसवण्याची तारीख ठरवण्यात येणार आहे. मात्र, बेळगाव प्रशासनानं 8 दिवसांत शिवरायांचा पुतळा बसवला नाही तर 9 व्या दिवशी गावकरी पुतळा बसवतील, अशी मनगुत्ती येथील गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्रात तिव्र पडसाद...

दरम्यान, बेळगावातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरून वातावरण तापलं होतं. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात या घटनेचे तिव्र पडसाद उमटले होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, जळगावसह राज्यभरात ठिकठिकाणी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. एवढंच नाही तर शिवसैनिकांनी भाजप आणि कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मराठी आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मनगुत्ती गावात पोलिसांना रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर रविवारी मराठी भाषिक महिलांनी आंदोलन केलं. मात्र, कर्नाटक पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, पोलिसांना न जुमानता मराठी भाषिकांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं होतं. त्यामुळे मनगुत्ती गावात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. अखेर बेळगाव जिल्हा प्रशासनानं मनगुत्ती येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचं आश्वासन दिलं आहे.

हेही वाचा...शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण, आता भाजपने शिवसेनेवर साधला निशाणा

मराठा आरामाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग आज अस्तित्वासाठी झगडतोय. काल पाहणीसाठी विजयदुर्ग किल्ल्यास भेट दिली. त्याआधी दोनदा दिल्लीत जाऊन सर्व त्या परवानग्या घेतल्या आहेत. लवकरात लवकर किल्ले विजयदुर्गाचे काम सुरू होईल.

First published:

Tags: Karnataka, Shivaji maharaj statue