• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • ...नाहीतर शेतकरी उद्या सरकारच्या मानगुटीवर बसेल, राजू शेट्टींचा थेट इशारा

...नाहीतर शेतकरी उद्या सरकारच्या मानगुटीवर बसेल, राजू शेट्टींचा थेट इशारा

'सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे, केंद्र सरकार (central government) आणि राज्य केंद्र सरकार (state government) हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत'

'सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे, केंद्र सरकार (central government) आणि राज्य केंद्र सरकार (state government) हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत'

'सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे, केंद्र सरकार (central government) आणि राज्य केंद्र सरकार (state government) हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत'

  • Share this:
बीड, 10 ऑक्टोबर : 'सरकार शेतकऱ्यांसोबत वैऱ्यासारखे वागत आहे, केंद्र सरकार (central government) आणि राज्य केंद्र सरकार (state government) हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामध्ये काही फारसा फरक नाही. कारण केंद्र सरकारने पश्चिम महाराष्ट्रात जून मध्ये महापूर झाला, पाहणी करायला आता पथक पाठवले मराठवाड्यातील पूर परिस्थिती पाहण्यासाठी तर मार्च-एप्रिलमध्ये पथक पाठवतील सध्या अंधेरी नगरी चौपट राजा अशी अवस्था झालेली आहे' अशी जळजळीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली. आज स्वाभिमान शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी बीडमधील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत रस्त्यावरती आहोत जर राज्य सरकारने मदत केली नाही, तर शेतकरी उद्या मानगुटीवर बसेल, असा इशारा राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी दिला. आधुनिक महिलांना नको असतं मूल, पाश्चिमात्यांचा प्रभाव चिंताजनक 'बांधावरती पाहणी करण्यासाठी सुद्धा काही शिल्लक राहिलेला नाही. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. यातच सोयाबीनची पेंड आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर कोसळले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर आहे तर दुसरीकडे या संदर्भात ऊसाची एफआरपी तीन टप्प्यात देण्याचे धोरण कारखानदार आणि सरकार राबवत आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. 'विमा कंपन्यांनी मात्र प्रचंड बदमाशी केली विमा कंपनी खोट रेकॉर्ड तयार करत आहे. या संदर्भात पुरावे आमच्या कडे आहेत. क्रॉप कटिंगचा रिपोर्ट सरळ-सरळ खोटा दिलेला आहे. एफआरपीच्या धोरणासंदर्भात आमचा कायम विरोध आहे. यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार आणि कारखानदार चुकीचं धोरण राबवत आहे. शेतकरी एकटा पडलेला आहे. केंद्र आणि राज्य आणि साखर कारखानदार विरोधात सुद्धा आम्ही ही लढाई लढून जिंकणार आहोत', असंही राजू शेट्टी म्हणाले. लस घेणाऱ्यांना मोफत तेल आणि अनेक गिफ्ट्स, या ठिकाणी मिळतेय ऑफर; पाहा PHOTOs 'महाविकास आघाडीवर नाराज असलो तरी उद्याच्या बंदला आमचा पाठिंबाच आहे, कोणी बंद पुकारला यापेक्षा उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे. अगदी जनरल डायरने सुद्धा शरमेने मान खाली घालावी या पद्धतीने गृह मंत्र्याच्या पुत्राने शेतकर्‍यांच्या अंगावरती गाडी घालून पाच शेतकर्‍या मारले. त्या शेतकऱ्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी या बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार आहे, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं.
Published by:sachin Salve
First published: