मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'जरडेश्वर'सोबत आणखी 32 कारखाने मग सोयीचं का झाकून ठेवायचं? राजू शेट्टींचा सोमय्यांना सवाल

'जरडेश्वर'सोबत आणखी 32 कारखाने मग सोयीचं का झाकून ठेवायचं? राजू शेट्टींचा सोमय्यांना सवाल

'जरडेश्वर कारखान्यासोबत 43 कारखाने आहेत, मग फक्त जरडेश्वरच का?  गैरसोयीच्या माणसाचं बाहेर काढायचं अन् सोयीच्या माणसाचं झाकून ठेवायचं'

'जरडेश्वर कारखान्यासोबत 43 कारखाने आहेत, मग फक्त जरडेश्वरच का? गैरसोयीच्या माणसाचं बाहेर काढायचं अन् सोयीच्या माणसाचं झाकून ठेवायचं'

'जरडेश्वर कारखान्यासोबत 43 कारखाने आहेत, मग फक्त जरडेश्वरच का? गैरसोयीच्या माणसाचं बाहेर काढायचं अन् सोयीच्या माणसाचं झाकून ठेवायचं'

पुणे, 22 ऑक्टोबर : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (kirit somiya) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जरडेश्वर साखर कारखान्याप्रकरणी ( Jardeshwar sugar factory case) गंभीर आरोप केले आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी या वादात उडी घेत सोमय्यांना सवाल केला आहे. 'जरडेश्वर कारखान्यासोबत आणखी 43 कारखाने आहेत, मग फक्त जरडेश्वरच का? असा सवाल केला आहे. पुण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची राजू शेट्टी यांनी साखर कारखाना शेतकरी व कारखानदार एफआरपी बाबत बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी जरडेश्वर साखर कारखान्याबद्दल त्यांनी काही प्रश्न उपस्थितीत केले. घरबसल्या अवघ्या 15 मिनिटांत करा मोठी कमाई, वाचा सविस्तर 'जरडेश्वर कारखान्यासोबत 43 कारखाने आहेत, मग फक्त जरडेश्वरच का? किरीट सोमय्या यांना प्रश्न आहे की, अस झालं तर हे कारखाने शेतकऱ्यांना मिळणार का? गैरसोयीच्या माणसाचं बाहेर काढायचं अन् सोयीच्या माणसाचं झाकून ठेवायचं, अशी टीका राजू शेट्टी यांनी सोमय्यांवर केली, तसंच,  'मी सहा वर्षांपूर्वी हेच सांगत होतो. साखर कारखान्यांची यादी फार मोठी आहे. सगळे चोर आहेत, चोरांना सरकार पाठीशी घालत आहेत', अशी टीकाही त्यांनी केली. '19 ऑक्टोबरला जयसिंगपूरला ऊस परिषद झाली त्यात काही ठरवा झाले त्याची प्रत आयुक्तांना देण्यात आली. साखर कारखान्यानी एक रक्कमी एफआरपी देण्यात यावे, डिसेंबरमध्ये तीन हजार तीनशे एवढी द्यावी व राहिलेली रक्कम जानेवारीपर्यंत द्यावी. ती तुकड्या तुकड्यात दिला जातोय, 32 महिने पैसे राहतात त्याच्या व्याज्याचं काय?' असा सवालही राजू शेट्टी यांनी विचारला. Monsoon Update: देशात मान्सून परतीचा प्रवास रखडला; 8 दिवसांपासून जैसे थे स्थिती 'केंद्र सरकारने साखरेचे भाव ३७ रुपये करावे. ही जबाबदारी पवार साहेबांची होती की नाबार्ड ज्या प्रकारे डेअरी उद्योगाला कर्ज देते मग साखरेला का नाही. हे राजकारणाचे अड्डे आहेत. राज्यात ९ लाख ऊसतोडणी कामगार आहेत. गोपीनाथ मुंडे महामंडळला केंद्र सरकारने मदत करावी. ऊसतोडणी मजूर नावनोंदणी करावी. जे कारखाने एक रक्कमी एफआरपी देणार नाहीत ते कारखाने चालू देणार नाही. ऊसदर नियंत्रण समितीच दुबळी आहे', असंही राजू शेट्टी म्हणाले. 'मी महाविकास आघाडीवर नाराज अन् भाजप सरकारवर खूश असं काही नाही. माझी वाटचाल अशीच असणार आहे. जो आडवा येईल त्याला तुडवायचा हे धोरण आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या