'...तर कृषीमंत्रिपद स्वीकारणार', राजू शेट्टींनी दाखवली तयारी

'...तर कृषीमंत्रिपद स्वीकारणार', राजू शेट्टींनी दाखवली तयारी

गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी राज्याचे नवे कृषीमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.

  • Share this:

चंद्रकांत फुंदे, पुणे, 3 डिसेंबर : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषीमंत्रीपद स्वीकारण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तयारी दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी राज्याचे नवे कृषीमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चांवर राजू शेट्टी यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'समोरून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण नक्की राज्याचं कृषीमंत्री स्वीकारू आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू,' अशी इच्छा स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन मुख्य पक्षांच्या सरकारमध्ये राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील सामील आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी राजू शेट्टी यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.

दरम्यान, राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या समर्थकांचा नंबर लागावा यासाठी राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी यांच्या दरबारात गेले आहेत. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सायंकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली.

बाळासाहेब थोरात आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास तीस मिनिटे झालेल्या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा थोरात यांनी केला आहे. दुसरीकडे, नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हेदेखील दिल्लीत आले असून तेदेखील सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. सोबतच काँग्रेसचे दुसरे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे देखील दिल्लीत देण्याची शक्यता असून तेदेखील काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

नागपूर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असा या काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे. आपल्या समर्थकांना मंत्रिपद मिळावं, यासाठीची आग्रही मागणी करण्यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सोनिया गांधींच्या दरबारी आल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 04:29 PM IST

ताज्या बातम्या