मुंबई, 27 मे : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी नेते राजू शेट्टी यांनी कविता लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजू शेट्टी म्हणतात,
मी संत नाही शांत आहे
गोतावळ्यातून दुरावलो
याची मनात खंत आहे !
दोन वेळा खासदार राहिलेल्या राजू शेट्टी यांचा या निवडणुकीत धक्कादायकरित्या पराभव झाला. त्यांच्या तुलनेत नवखे असलेले शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यांचा पराभव केला.
गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी हे भाजपचे मित्रपक्ष होते पण ही निवडणूक मात्र त्यांनी आघाडीसोबत लढवली आणि युतीच्या उमेदवाराकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीत हार झाली असली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठीचं राजकारण आपण सुरूच ठेवणार आहोत, असं राजू शेट्टी म्हणतात.
म्हणून चला .. भूमीपुत्रांनो उठा
नवा एल्गार करू.. !
गोरगरिबांच्या हक्कासाठी
आजपासून संघर्षाचा
नवा अध्याय सुरू...!
असं म्हणत पुन्हा एकदा आपण मैदानात उतरू, असंही राजू शेट्टी यांनी सूचित केलं आहे. ही कविता त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट केली आहे. कट करून गाडलेल्या बळीचा मी पुत्र आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
शेतकऱ्यांसाठी लढा सुरूच
हातकणंगलेमधून राजू शेट्टींचा विजय होईल, अशी अपेक्षा सुरुवातीला सगळ्यांनाच होती. पण ज्या साखर कारखानदारांना राजू शेट्टींनी विरोध केला त्यांच्याशीच त्यांनी जवळीक साधल्यामुळे मतदार त्यांच्यावर नाराज झाले आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीची ही लढाई राजू शेट्टी हरले.
या कवितेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे आता ते या पराभवातून धडे घेऊन पुढची वाटचाल कशी करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
=============================================================================
VIDEO पार्थ पवार यांच्या पराभवाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या सुप्रिया सुळे