विधानसभा निवडणुकीला उभे राहण्याआधीच चंद्रकांत पाटलांना 'ओपन चॅलेंज'

विधानसभा निवडणुकीला उभे राहण्याआधीच चंद्रकांत पाटलांना 'ओपन चॅलेंज'

यंदा चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमधील एखाद्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

  • Share this:

बीड, 18 सप्टेंबर : मागच्या दाराचे आमदार, असं म्हणत विधानसभा निवडणूक न लढवण्याबाबत विरोधक सातत्याने भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांना लक्ष्य करत असतात. त्यामुळे यंदा चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरमधील एखाद्या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. पण चंद्रकांत पाटलांचा मतदारसंघ ठरण्याआधीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांना आव्हान दिलं आहे.

'ज्या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील उभे राहणार त्या ठिकाणाहून मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार,' अशी घोषणाच राजू शेट्टी यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव इथं आयोजित दुष्काळ मुक्तीचा महासंग्राम महामोर्चा कार्यक्रमाला राजू शेट्टी उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजप सरकार आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली.

शेट्टींनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं

'भाजप आणि शिवसेना यांच्याविरोधात लढताना मतविभाजन टाळण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत छोट्या-मोठया पक्षांनी महाआघाडी स्थापन करावी. वंचित बहुजन आघाडीनेही या महाआघाडीत यावं,' असं आवाहन राजू शेट्टी यांनी प्रकाश आंबेडकर आणि इतर विरोधकांना केलं आहे. विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटना पूर्ण ताकदीचे उमेदवार देणार आहे, असं म्हणत राजू शेट्टी यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं आहे.

चंद्रकांत पाटील आणि विधानसभा निवडणूक

चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यात बोलताना विभासभेची निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने आदेश दिला तर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं पाटील यांनी पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात स्पष्ट केलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी आत्तापर्यंत थेट निवडणूक कधीच लढविलेली नाही. ते कायम विधानपरिषदेच्या माध्यमातूनच आमदार झाले आहेत. मात्र राज्यातलं वातावरण अनुकूल असल्याने दादांनी आता थेट लोकांमधून निवडून येण्याचं ठरवल्याचं बोललं जात आहे.

चंद्रकांत पाटील हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे विश्वासू आहेत. मागील पाच वर्षांपर्यंत दादा हे कायम पडद्यामागे राहूनच संघटनेचं काम करत असत. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर चंद्रकांत पाटलांना मंत्रिमंडळात क्रमांक दोनचं स्थान देण्यात आलं. तेव्हापासून त्यांचं वजन भाजपमध्ये चांगलंच वाढलं.

लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांनी थेट बारामतीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांना लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून दिलं गेलं. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून निवडणूक लढवून या सर्व टीकेला उत्तर देण्याचा त्यांचा विचार असल्याचं बोललं जात आहे.

SPECIAL REPORT: 78 वर्षांच्या पवारांची तरुणांनाही लाजवेल अशी फटकेबाजी

Published by: Akshay Shitole
First published: September 18, 2019, 9:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading