आत्मक्लेश यात्रेत पाहुण्यासारखे येऊ नका, राजू शेट्टींनी सदाभाऊ खोतांना सुनावलं

आत्मक्लेश यात्रेत पाहुण्यासारखे येऊ नका, राजू शेट्टींनी सदाभाऊ खोतांना सुनावलं

पण कामाच्या व्यापात सदाभाऊ यात्रेत पूर्णदिवस येतील असं वाटत नसल्याचा टोलाही त्यांनी सदाभाऊंना लगावलाय.

  • Share this:

09 मे : आत्मक्लेश यात्रेत सहभागी होण्यासाठी याल तर पाहुण्यासारखे येऊ नका अशा शब्दात राजू शेट्टी यांनी आपले सहकारी सदाभाऊ खोतांना सुनावलंय. ते सोलापुरात बोलत होते.

राजू शेट्टी यांनी 22 मे रोजी कोल्हापूर ते मुंबई आत्मक्लेश यात्रेची घोषणा केलीये. या यात्रेवरुन आता राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात आता स्वाभिमानाची संघर्ष सुरू झालाय.

राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोतांना अटीच लागू केल्या आहेत.

सदाभाऊंनी पाहुण्यासारखे यात्रेला भेट देऊन चालणार नाही. सदाभाऊंना यात्रेत यायचे असेल तर पूर्ण दिवस सहभागी व्हावे लागेल अशा शब्दातच राजू शेट्टी यांनी सुनावलंय. पण कामाच्या व्यापात सदाभाऊ यात्रेत पूर्णदिवस येतील असं वाटत नसल्याचा टोलाही त्यांनी सदाभाऊंना लगावलाय.

First published: May 9, 2017, 6:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading