राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी'ला आता शिवसेनेचा धक्का

राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी'ला आता शिवसेनेचा धक्का

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. भाजपसाठी राजू शेट्टींची साथ प्रदेशाध्यक्षांनीच सोडल्यानंतर आणखी एक धक्का शिवसेनेकडून बसणार आहे.

  • Share this:

उदय जाधव

मुंबई, 2 ऑक्टोबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. भाजपसाठी राजू शेट्टींची साथ प्रदेशाध्यक्षांनीच सोडल्यानंतर आणखी एक धक्का शिवसेनेकडून बसणार आहे. गेल्याच आठवड्यात स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला आणि भाजपला साथ जाहीर केली. त्या पाठोपाठ आता स्वाभिमानीच्या युवा विभागाच्या उपाध्यक्ष शर्मिला येवले शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. शर्मिला येवले यांचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होईल, असं सूत्रांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला तीन दिवस उरलेले असताना महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाराज नेत्यांनी दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होतोय. एकेक करत आता राजू शेट्टी यांच्या बरोबर असलेले पहिल्या फळीतले मोहरे सत्ताधारी पक्षांकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

वाचा - अमित देशमुखांची कोंडी करण्यासाठी भाजपची खेळी, लातूर काँग्रेसमध्ये भूकंप?

सदाभाऊ खोत यांनी भाजपशी सलगी करत नव्या संघटनेची स्थापना केल्यानंतर राजू शेट्टी यांनी आक्रमक रविकांत तुपकर यांची स्वाभिमानीच्या प्रदेशाध्यपदी नेमणूक केली. लोकसभा निवडणुकीत रविकात तुपकर यांनी अत्यंत आक्रमकपणे भाजप सरकारवर हल्लाबोल केला होता. तेच तुपकर आता भाजपला साथ देत आहेत. लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना आघाडीच्या जागावाटपामुळे इच्छा असूनही लढण्याची संधी मिळाली नाही.

हे वाचा - भाजपमध्ये तिकिटावरून नाट्य सुरूच, कार्यकर्त्यांची गडकरी वाड्यावर धडक

त्यानंतर त्यांना विधानसभेचं आश्वासन दिल्याचं बोललं गेलं. मात्र आताही त्यांना कोणताही मतदारसंघ सोडला जात नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर त्यांनी राजीनामा देऊन रयत क्रांती संघटनेत प्रवेश केला. आता शर्मिला येवले शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

-------------------------------------------------------

भाजपच्या महिला आमदारानी नाकारली राज ठाकरे-अजित पवारांची ऑफर, दिलं हे उत्तर

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 2, 2019, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading