ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्याबद्दल राजू शेट्टींची दिलगिरी

ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या 'त्या' वक्तव्याबद्दल राजू शेट्टींची दिलगिरी

ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आता राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, संदीप राजगोळकर, 05 एप्रिल : सैन्यात आपली पोरं सैन्यात जातात. देशपांडे, कुलकर्णी सैन्यात जात नाहीत असं वादग्रस्त विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलं होतं. त्यानंतर पुण्यातील ब्राह्मण जागृती सेवा संघानं खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. शिवाय, आंदोलनाची देखील हाक दिली होती.

दरम्यान, या प्रकरणावर आता राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. बोलताना माझ्याकडून अनावधनानं उल्लेख झाला. माझा मुळ उद्देश हा शहीद जवान आणि वारसांना न्याय देण्याचा होता. कुणीही माझ्या वक्तव्याने वाईट वाटून घेऊ नये असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. शिवाय, माझ्या मनाला जातीयवाद शिवू शकत नाही. मी फुले, शाहू, आंबेडकरांच्या जडणघडणीतला असून शरद जोशी यांच्या संघटनेचा मला वारसा असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या वादावर आता राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

काय केलं होतं राजू शेट्टींनी विधान

निवडणुकीनंतर 'चौकीदार' जेलमध्ये असेल- राहुल गांधी

First published: April 5, 2019, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading