मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोदी आणि ठाकरे सरकारला झटका देण्याची रणनिती; MSP वर आता गल्ली ते दिल्ली आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा

मोदी आणि ठाकरे सरकारला झटका देण्याची रणनिती; MSP वर आता गल्ली ते दिल्ली आंदोलन, राजू शेट्टी यांची घोषणा

Raju Shetty: एमएसपीच्या मुद्द्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी राजधानी दिल्लीत राजू शेट्टी यांची नव्या शेतकरी संघटनेची घोषणा देखील केली आहे.

Raju Shetty: एमएसपीच्या मुद्द्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी राजधानी दिल्लीत राजू शेट्टी यांची नव्या शेतकरी संघटनेची घोषणा देखील केली आहे.

Raju Shetty: एमएसपीच्या मुद्द्यावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी राजधानी दिल्लीत राजू शेट्टी यांची नव्या शेतकरी संघटनेची घोषणा देखील केली आहे.

नवी दिल्ली, 22 मार्च : शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आता दिल्ली ते गल्लीपर्यंत किमान आधारभूत किमती (MSP) संदर्भात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राजधानी दिल्लीत राजू शेट्टी यांची नव्या शेतकरी संघटनेची घोषणा देखील केली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या व्यतिरिक्त दिल्लीत आज एमएसपी गॅरंटी किसान मोर्चा (MSP Guarantee Kisan Morcha) या नवीन शेतकरी संघटनेची बैठक पार पडली. येथील गांधी पिस फाउंडेशन मधील सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला देशभरातून विविध शेतकरी संघटनेचे नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीला गेल्या दोन वर्षात शेतकरी आंदोलनाचा चेहरा ठरलेले राकेश टीकैत यांनी मात्र या बैठकीकडे कानाडोळा केला होता. एमएसपी (किमान आधारभूत किंमत) (Minimum Support price of crops) च्या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी या नवीन संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेचे नाव एमएसपी गॅरंटी मोर्चा आहे.

मोदी आणि ठाकरे सरकारला झटका देण्याची रणनिती, गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजू शेट्टींनी केली मोठी तयारी

या बैठकीला माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी नेते विख देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शेट्टी यांनी या नवीन संघटनेखाली देशभरातील संघटना एमएसपीच्या मागणीसाठी एकत्र येतील. सोबतच प्रत्येक गावातून एमएसपी संदर्भात एक निवेदन तयार करण्यात येणार असून ते निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार आहे.

वाचा : मुख्यमंत्र्यांचे मेहुणे ईडीच्या रडारवर; श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त

यासोबतच यापुढे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांच्या झेंड्याखाली आंदोलन होणार नाही. तर यापुढे आंदोलन एमएसपी गॅरंटी मोर्चाच्या झेंड्याखाली आंदोलन होईल, अशी घोषणा देखील राजू शेट्टी यांनी यावेळी केली आहे. या नवीन शेतकरी संघटनेच्या वतीने देशभरात पुढील 6 महिन्यात एमएसपीसाठी देशभरात मोर्चे काढण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने विविध पिकांच्या एमएसपी संदर्भात मागण्या करण्यात येणार आहेत.

यासोबतच प्रत्येक गावात एक गाव समिती स्थापन करून राष्ट्रपतींच्या नावाने एमएसपीच्या मागणीसाठी ठराव पाठविण्यात येणार आहे. आगामी सहा महिन्यानंतर राजधानी दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी शेट्टी यांनी केली.

First published:
top videos

    Tags: Farmer, Maharashtra News, Raju shetty