Home /News /maharashtra /

राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याने पुलावरून नदीत मारली उडी, रेस्क्यूचा LIVE VIDEO

राजू शेट्टींच्या कार्यकर्त्याने पुलावरून नदीत मारली उडी, रेस्क्यूचा LIVE VIDEO


या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी पुलाकडे धाव घेतली पण तोपर्यंत त्याने पाण्यात उडी मारली होती.

या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी पुलाकडे धाव घेतली पण तोपर्यंत त्याने पाण्यात उडी मारली होती.

या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी पुलाकडे धाव घेतली पण तोपर्यंत त्याने पाण्यात उडी मारली होती.

पंढरपूर, 5 सप्टेंबर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी नेतृत्वाखाली परिक्रमा यात्रा काढण्यात आली आहे.  ही यात्रा नृसिंहवाडीच्या पुलावर आली असता एका कार्यकर्त्याने पुलावरून पंचगंगा नदीत उडी मारली. सुदैवाने पोलिसांनी आणि रेस्क्यू टीमच्या जवानांनी त्याला वाचवले. राजू शेट्टी यांची नृसिंगवाडीमध्ये सभा सुरू आहे. त्यांच्या सभेला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पोहोचत आहे. त्यांची सभा सुरू असताना हा प्रकार घडला.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने नृसिंहवाडी पुलावरुन पंचगंगा नदीत उडी मारली. बाहुबली सावळे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. पंचगंगेत पात्रात जलसमाधी घेण्याचा त्याने प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी पुलाकडे धाव घेतली पण तोपर्यंत त्याने पाण्यात उडी मारली होती. ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी आधीच यासाठी बंदोबस्त तैनात केला होता. पंचगंगा नदीत दोन रेस्क्यू टीमच्या बोटी तैनात होत्या. त्यांनी तातडीने धाव घेतली आणि बुडत असलेल्या कार्यकर्त्याला बाहेर काढलं. निकसोबत गोल्फ खेळताना दिसली प्रियंका चोप्रा; असा घेतेय Weekendचा आनंद राजू शेट्टी यांनी जलसमाधी घेणार अशी केली होती. त्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. रेस्क्यू फोर्स जवानांच्या १० यांत्रिक बोटी तैनात करण्यात आल्या होता. कुरुंदवाड येथील कृष्णा घाट, दिनकराव यादव पूल आणि नदी परिसरात बोटी तैनात आहेत. त्यामुळे आज मोठा अनर्थ अगदी थोडक्यात टळला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Raju shetty, Swabhimani Shetkari Sanghatana, राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

पुढील बातम्या