'स्वाभिमानी'ची राज्यस्तरीय कार्यकारिणी बरखास्त, आता कुणाला मिळणार संधी?

पक्ष संघटना पुन्हा नव्याने बांधण्यासाठी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्यस्तरीय कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता पक्षाकडून पुन्हा एकदा नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे या नव्या कार्यकारिणीत नक्की कुणाला संधी मिळते, याची उत्सुकता आहे.

लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदारसंघात धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही पक्षाची साथ सोडली होती. मात्र काही दिवसांतच रविकांत तुपकर पुन्हा पक्षात परतले. विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानीचा एक उमेदवार निवडून आला आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना पुन्हा नव्याने बांधण्यासाठी कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राजू शेट्टी यांना कृषीमंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगत होती. कृषीमंत्रीपद स्वीकारण्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तयारी दर्शवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी राज्याचे नवे कृषीमंत्री होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चांवर राजू शेट्टी यांनी आता आपली प्रतिक्रिया दिली होती.

'समोरून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आपण नक्की राज्याचं कृषीमंत्री स्वीकारू आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावू,' अशी इच्छा स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन मुख्य पक्षांच्या सरकारमध्ये राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील सामील आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी राजू शेट्टी यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading