राजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ सारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही

राजू शेट्टी म्हणाले, सदाभाऊ सारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही

सदाभाऊ सारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही. मी शेतकऱ्यांसाठी काम करणारा असून कोणालाही अंगावर घेण्याची माझी तयारी आहे, असा पलटवार त्यांनी खोत त्यांच्यावर केला. 

  • Share this:

पंढरपूर,24 जानेवारी: राज्यातील शेतकऱ्यांचा साताबारा कोरा करण्याची सुबुद्धा ठाकरे सरकारमधील नेत्यांना मिळावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांने पंढरीच्या विठूरायाला साकडं घातलं आहे. भाजप सरकारनंतर राज्यात नव्याने स्थापन झालेल्या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र सातबारा कोरा करण्याचा आश्वासन देणाऱ्या सरकारने शेतकर्‍यांच्या तोंडाला पानं पुसली, अशी टीका देखील राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

राजू शेट्टी म्हणाले, 30 सप्टेंबर 2019 पर्यतच्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याची मागणी आम्ही सरकारकडे केली होती. मात्र, ती मान्य केली नाही. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये सहभाग घेतलेल्या प्रमुख तिन्ही पक्षांच्या नेत्यांना सुबुद्धी मिळावी, यासाठी आपण विठ्ठलाला साकडं घातलं आहे.

सदाभाऊ सारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे लक्ष देत नाही...

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी कडकनाथ कोंबडी घोटाळ्यामध्ये आपण सहभागी असलो तर राजकीय संन्यास घेईन, असं वक्तव्य केलं असलं तरी ते निर्दोष असतील तर त्यांनी ईडीकडे जाऊन सांगावं. मी सर्व पुरावे तिथे दिले आहेत. सदाभाऊ सारख्या फालतू लोकांच्या वक्तव्याकडे मी लक्ष देत नाही. मी शेतकऱ्यांसाठी काम करणारा असून कोणालाही अंगावर घेण्याची माझी तयारी आहे, असा पलटवार त्यांनी खोत त्यांच्यावर केला. 

भाजप सरकारने घेतलेले सगळेच निर्णय सरसकट रद्द करणे चुकीचे आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार असलाच पाहिजे याच त्यानी समर्थन केल आहे. ठाकरे सरकार शेतकर्याची फसवणूक करत असल्याची भावना त्यांनी मांडली आहे.

First published: January 24, 2020, 3:41 PM IST

ताज्या बातम्या