गळीत हंगामाचा बिगुल वाजणार, 19 व्या ऊस परिषदेसाठी स्वाभिमानीनं कंबर कसली

गळीत हंगामाचा बिगुल वाजणार, 19 व्या ऊस परिषदेसाठी स्वाभिमानीनं कंबर कसली

शेतकऱ्यांना आता रस्त्यावरची व कायदेशीर अशी दोन्ही लढाई लढावी लागणार

  • Share this:

कोल्हापूर, 16 ऑक्टोबर: जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर 2 नोव्हेंबर रोजी 19 वी ऊस परिषद होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.

गळीत हंगामाचा बिगुल वाजू लागला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळ येथील राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली.

हेही वाचा..हृदयद्रावक! खेळायला गेलेल्या बहीण-भावासह तिघे बुडाले, आई-वडिलांनी फोडला हंबरडा

राजू शेट्टी म्हणाले की, साखर कारखादारांनी शेतकऱ्यांना आव्हान देत शेतकऱ्यांकडून दबाव टाकून स्वाक्षरी घेतल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना आता रस्त्यावरची व कायदेशीर अशी दोन्ही लढाई लढावी लागणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी संघटनेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन केले. सध्या सरकारने सिनेमागृह, हॉटेल , रेस्टॉरंट यांना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यानीच 1 नोव्हेंबर नंतर राज्यातील लॉकडाऊन शिथिल करणार असल्याचे सुतोवाच केले आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गेली 18 वर्षे ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत ऊसदर ठरत असल्याने सरकारने ऊस परिषदेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे व 19 वी ऊस परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा...मोठी बातमी : सरकारच्या निर्णयानंतरही महिलांसाठी लोकल प्रवास नाहीच!

यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, स्वाभिनानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, वैभव कांबळे, आण्णासो चौगुले, आदिनाथ हेमगीरे, मिलिंद साखरपे, अजित पोवार, यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Published by: Sandip Parolekar
First published: October 16, 2020, 9:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading